अमरनाथ गुहेत दिव्य शिवलिंगाचे पहिले छायाचित्र समोर…

पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानी यांचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. यावेळी बर्फापासून बनलेले शिवलिंग सुमारे ७ फूट उंच आहे. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे बर्फापासून तयार होते आणि ते भगवान शिवाची नैसर्गिक रूप आहे. या शिवलिंगाला बाबा बर्फानी असेही म्हटले जाते. हे शिवलिंग 8 ते 10 फूट उंचीचे असते आणि ते हवामानानुसार कमी जास्त होते.… Continue reading अमरनाथ गुहेत दिव्य शिवलिंगाचे पहिले छायाचित्र समोर…

गुड फ्रायडे म्हणजे नक्की काय..?

ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर चढवून त्याला मारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस… Continue reading गुड फ्रायडे म्हणजे नक्की काय..?

सुमारे ३०० वर्षानंतर श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची सांगता झाली. “सुमारे तीनशे वर्षांनंतर खंडित असलेल्या या मंदिरातील वार्षिक उत्सव पुन्हा यावर्षी पासून सुरु झाला. होळी पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हा उत्सव असतो. गुढीपाडव्यानंतर चैत्र मासातील शिव विष्णूचा नवरात्रोत्सव उत्सव रामनवमी पर्यंत… Continue reading सुमारे ३०० वर्षानंतर श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीला का आहे एवढं महत्व..?

दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता श्री जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. दख्खनचा राजा जोतिबाच्या या पूर्वपार चालत आलेल्या परंपरेने आजही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात. माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर… Continue reading जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीला का आहे एवढं महत्व..?

महाराष्ट्रातील ‘या’ गावामध्ये मारुतीच नावही घेत नाहीत..!

आहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मारुतीचे मंंदिर पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी मारुतीचे पुजा केली जाते. पण महाराष्ट्रातील या गावामध्ये मारुतीची पुजाचं नाही तर मारुती हा शब्दही उच्चारणं चुकीचं मानलं जातं. एवढंच नाही तर या गावामध्ये मारुती नावाचा माणूसही नाही आणि मारुती नावाच्या व्यक्तीला या गावातील कोणी मुलगीही देत नाही. या गावामध्ये मारुती आणि हनुमानाला एवढा… Continue reading महाराष्ट्रातील ‘या’ गावामध्ये मारुतीच नावही घेत नाहीत..!

बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचे  वाटप करण्यात येणार आहे. येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिन येत्या सोमवारी 31 मार्च रोजी असून त्यानिमित्त या दिवशी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी… Continue reading बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

संकष्ठीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणेशाची विशेष पूजा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : करवीर महात्म ग्रंथात उल्लेख असलेल्या जयंती नदी शेजारील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात अगस्ती ऋषी यांनी सपत्नीक पूजा आणि तिथे वास्तव्य केल्याची नोंद आहे .नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीच्या संदर्भाने शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी दिनी कमळ पुष्पावर विराजमान हलव्याच्या कलात्मक दागिने आणि मुकुटासह विशेष पूजा बांधण्यात आली होती . पश्चिम महाराष्ट्र… Continue reading संकष्ठीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणेशाची विशेष पूजा..!

गगनगडावर 9 जानेवारीला होणार उरूस साजरा

गगनबावडा ( प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि. 9 ) रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंग रंगोटी करण्यात आली आहे. शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ गगनगडावर नेण्यात… Continue reading गगनगडावर 9 जानेवारीला होणार उरूस साजरा

नववर्षात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. यानिमित्तानं देवदर्शन घेत नववर्षाचं स्वागत केलं जातेय. कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक कोल्हापुरात दाखल झालेत. जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. नवीन संकल्प करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात सकाळपासूनच दाखल झालेत.… Continue reading नववर्षात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ‘या’ दिवशी रात्रभर खुले ; ट्रस्टचा मोठा निर्णय

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिर नव वर्षानिमित्त भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दाखल होत देवीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करतात. त्यामुळे देवी मंदिर ट्रस्टने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय घेतला आहे.. साडेतीन… Continue reading श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर ‘या’ दिवशी रात्रभर खुले ; ट्रस्टचा मोठा निर्णय

error: Content is protected !!