मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

जालना ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. २१ जानेवारी रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे, आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचं आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.राज्य शासनाबाबत तक्रार… Continue reading मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

धक्कादायक…! पिराचीवाडी, कागलमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

कागल ( प्रतिनिधी ) पिराचीवाडी तालुका कागल येथे बुधवारी (17 जानेवारी) दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले या दोघी बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे पिराचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश भोसले हे शेतकरी आहेत त्यांचे पिराचीवाडी येथे ऊस… Continue reading धक्कादायक…! पिराचीवाडी, कागलमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघाला सदिच्छा भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पाला गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी डॉ.महेश कदम म्हणाले की, गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव… Continue reading डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघाला सदिच्छा भेट…

‘या’ राज्यांमध्ये 22 जानेवारीला ‘ड्राय डे’ जाहीर

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 22 जानेवारीला अयोध्येत भगवान श्री रामांच्या मूर्तीचे अभिषेक होणार आहे. या राम मंदिराचे बांधकाम सुरु आहे आणि त्याच दरम्यान हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, या दिवशी लाखो लोक अयोध्येला पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच काही राज्यांनी या दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे… Continue reading ‘या’ राज्यांमध्ये 22 जानेवारीला ‘ड्राय डे’ जाहीर

डी. वाय. पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा : डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील यांच्या वाढदिवसाचे… Continue reading डी. वाय. पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा : डॉ. डी. टी. शिर्के

भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण; सहभागी होण्याचं केलं आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत CDS कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील… Continue reading भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण; सहभागी होण्याचं केलं आवाहन

पुण्यामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : दोन अभिनेत्रींना केली अटक

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क आणि विमानतळ परिसरात ही मोठी कारवाई केली आहे. तर उजबेकिस्तान आणि राजस्थानमधील दोन युट्यूब अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (मंगळवार) दुपारी ही कारवाई करण्यात आली असून दलाल या दोन तरुणींकडून वेश्या व्यवसाय… Continue reading पुण्यामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : दोन अभिनेत्रींना केली अटक

आपण कोणत्याही धर्माचे असला तरी आपल्या प्रार्थनास्थळावर स्वच्छता मोहीम राबवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघामधील मधील मृत्यूंजय मंदिरात महादेवांचे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली… Continue reading आपण कोणत्याही धर्माचे असला तरी आपल्या प्रार्थनास्थळावर स्वच्छता मोहीम राबवा- चंद्रकांत पाटील

मीडिया क्षेत्रात ‘अदानीं’ची नवी चाल; ‘या’ वृत्तसंस्थेत वाढवली भागीदारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गौतम अदानी समूहाने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वृत्तसंस्थेमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, समूहातील आघाडीची कंपनी अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की, त्यांची उपकंपनी AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 5 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. AMG Media Networks ने मतदान अधिकारांसह IANS शेअर्सची… Continue reading मीडिया क्षेत्रात ‘अदानीं’ची नवी चाल; ‘या’ वृत्तसंस्थेत वाढवली भागीदारी

31 डिसेंबर 2024 पर्यंत या राशींवर शनिदेव करतील कृपा; लाभेल नशीबाची साथ

लाईव्ह मराठी ( प्रतिनिधी ) 2024 मध्ये, न्याय आणि कर्मांची देवता शनि, कुंभ राशीत विराजमान होईल आणि त्याचे राशी बदलणार नाही, परंतु या वर्षी पूर्वाभाद्रपद आणि शतभिषा नक्षत्रात संक्रमण करेल. शनी जून 2024 मध्ये कुंभ राशीमध्ये मागे फिरेल आणि नोव्हेंबर 2024 मध्ये थेट वळेल. ज्याचा 12 राशींवरही सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल, परंतु काही राशींवर… Continue reading 31 डिसेंबर 2024 पर्यंत या राशींवर शनिदेव करतील कृपा; लाभेल नशीबाची साथ

error: Content is protected !!