पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क आणि विमानतळ परिसरात ही मोठी कारवाई केली आहे. तर उजबेकिस्तान आणि राजस्थानमधील दोन युट्यूब अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (मंगळवार) दुपारी ही कारवाई करण्यात आली असून दलाल या दोन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करत राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे.