‘राजाराम साखर’ मारहाण प्रकरणात 25 संशयितांवर गुन्हा नोंद 8 जण ताब्यात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना काल दिनांक 2 जानेवारी रोजी कसबा बावडा येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत मारहाणीत जखमी झालेले चिटणीस यांनी आज शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत चिटणीस यांनी म्हटलं आहे की, संशयतांनी राजाराम कारखान्याच्या निवडणूकीत… Continue reading ‘राजाराम साखर’ मारहाण प्रकरणात 25 संशयितांवर गुन्हा नोंद 8 जण ताब्यात

कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर ते तरळे या राष्ट्रीय महामार्गातील कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याच्या रस्ता कामाच्या भूसंपादनासाठी केंद्राकडून 39 कोटी 30 लाख रक्कमेस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या भूसंपादनासाठी द्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूर ते तळेरे हा राष्ट्रीय… Continue reading कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल 9 कोटींची उलाढाल

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात 7 लाख शेतकरी व नागरीकांनी भेट देत शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून 50 लाखांची उलाढाल ही… Continue reading सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल 9 कोटींची उलाढाल

सतेज कृषी प्रदर्शनात 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाचे उदघाटन प्रगतशील शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी बोलताना आम सतेज पाटील यांनी सांगीतले की, सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गेल्या… Continue reading सतेज कृषी प्रदर्शनात 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखड्यासाठी सरकारनं कोणती कार्यवाही केली ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात जमीन हस्तांतर, स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली ?असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर शहरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक… Continue reading राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखड्यासाठी सरकारनं कोणती कार्यवाही केली ?

तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी” प्रदर्शन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’आयोजित करण्यात येते. यावर्षीचे हे पाचवे प्रदर्शन 22 ते 25 डिसेंबर 202३ या कालावधीत तपोवन मैदान येथे होणार… Continue reading तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी” प्रदर्शन

“लेक माझी लाडकी” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘लेक माझी लाडकी’योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने किती निधीची तरतूद केली ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात ‘लेक माझी लाडकी’च्या अंमलबजावणीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मुलींच्या सक्षमीकरणाकरीता लेक माझी लाडकी या नवीन योजनेची घोषणा करण्यात… Continue reading “लेक माझी लाडकी” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-आमदार सतेज पाटील

आमदार सतेज पाटील यांनी केली संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील संभाजीनगर येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या बस स्थानक कामाची पाहणी करून, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बस स्थानकाचं नाव श्री छत्रपती संभाजी महाराज नगर बसस्थानक, असे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा… Continue reading आमदार सतेज पाटील यांनी केली संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी

सारथी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; काँग्रेस सहा आमदारांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2022 पर्यंत केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती. मात्र, 2022-23 या वर्षात काढण्यात आलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची अट घातली आहे. शिवाय केवळ 50 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्यात येणार असल्याचे नमुद आहे. परिणामी,… Continue reading सारथी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; काँग्रेस सहा आमदारांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

‘सारथी’ सरसकट शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सारथीने काढलेल्या जाहिरातीमध्ये आधिछात्रवृती धारकांच्या संख्येबाबत कोणताही उल्लेख नसल्याने केवळ 200 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारला घेता येणार नाही. असे आमदार सतेज पाटील म्हटले आहे. राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी करणारे 1400 विद्यार्थी पात्र असताना केवळ 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा… Continue reading ‘सारथी’ सरसकट शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार- आमदार सतेज पाटील

error: Content is protected !!