कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात 7 लाख शेतकरी व नागरीकांनी भेट देत शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून 50 लाखांची उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे.

महिला बचत गटांच्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 30 लाखांची उलाढाल झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल 9 कोटीची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.

शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली 4 वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे 5 वे प्रदर्शन 22 डिसेंबर रोजी सुरू झाले आहे. आज याची 25 डिसेंबर रोजी सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली.

चार दिवसात कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक, इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी होती. प्रदर्शनात साडेपाच फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा पाहण्यासाठी लोकांनी व शेतकऱ्यांनी चार दिवस गर्दी केली होती.