डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे 7 दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना आणि सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन  सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले.  डी. वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सैनिक गिरगाव येथे आयोजित 7 दिवसीय श्रमसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे 7 दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने गौरव

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत” च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नवभारतचे अध्यक्ष रामगोपाल माहेश्वरी,… Continue reading डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने गौरव

डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक  टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या 243 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. ऑफिसर राजेश रोकडे, ऋषिकेश गुंड यांनी या  इंटरव्यू घेतल्या.या कॅम्पस इंटरव्यू मध्ये डी. वाय. पाटील… Continue reading डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक  टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल : डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :  डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटेल असा विश्वास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे… Continue reading प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल : डॉ. संजय डी. पाटील

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या  रणवीर काटकर आणि अथर्व पाटील हे पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करतील.  ओंकार चोपडे याची भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मलखांब स्पर्धेसाठी, सौरीष साळुंखे याची… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट, फेलो म्हणून निवड

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस)च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे. विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची जीवशास्त्र विषयासाठी तर डॉ. विश्वजीत खोत यांची भौतिक शास्त्र विषयासाठी यंग असोसिएट म्हणून आणि डॉ. जे. एल. गुंजकर यांची फेलो म्हणून निवड… Continue reading डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट, फेलो म्हणून निवड

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती

तळसंदे ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित केलेल्या इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे लाईनमन आणि तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिकल पोल वरती काम करण्यासाठी चढ-उतार करणे सोपे… Continue reading डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला 26 वे पेटंट; प्रा. संतोष आळवेकर यांचे संशोधन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आरसीसी कॉलमची स्ट्रेंथ काढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणासाठी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पेटंट मंजूर झाले आहे. महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रा. संतोष आळवेकर यांनी हे उपकरण संशोधित केले असून महाविद्यालयाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे.कोणत्याही इमारतीच्या बांधकामामध्ये आरसीसी कॉलम हे महत्त्वपूर्ण असतात. या कॉलमवरच इमारतीचा सर्व भर पेलला जातो, त्यामुळे त्याची… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला 26 वे पेटंट; प्रा. संतोष आळवेकर यांचे संशोधन

डी. वाय. पाटील अभियांत्रीकीच्यावतीने बहिरेश्वर येथे कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित जमिनीचे रेखांकन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे ‘कंटूर मॅप’ म्हणजेच समोच्च भौगोलिक नकाशा बनवण्याची कार्यशाळा बहिरेश्वर (ता. करवीर) येथे उत्साहात संपन्न झाली. या नकाशामुळे जमिनीचे उंच व सखल भाग ओळखता येतात. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या नकाशाचा उपयोग होतो. या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये डिफरन्शियल जीपीएस(डीजीपीएस) व ड्रोन… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रीकीच्यावतीने बहिरेश्वर येथे कार्यशाळा संपन्न

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ‘टेक्नोत्सवा’चे आयोजन

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत “टेक्नोत्सव 2024” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.… Continue reading डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ‘टेक्नोत्सवा’चे आयोजन

error: Content is protected !!