कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात जमीन हस्तांतर, स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली ?असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर शहरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचं काम तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मे-2023 मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन देऊन सहा महिने उलटले तरी याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नउपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

यावर उत्तर देताना, सदरची जमीन महापालिकेस हस्तांतरित करण्याच्या अनुषंगानं महापालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.