कोल्हापूर ( प्रतिनिधी ) 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाचे उदघाटन प्रगतशील शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी बोलताना आम सतेज पाटील यांनी सांगीतले की, सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षापासून विविध शेती विषयक माहिती देण्याचा प्रयत्न झालेला आहे. या हे पाचवे प्रदर्शन असून आयोजित केलेले प्रदर्शन नवनवीन विकसित तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांसमोर आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसाय कमी खर्चात कसा करावा, शेती कशी करावी याविषयीचे मार्गदर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. शाश्वत पद्धतीने शेती कशी करावी याचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणार आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, श्रीमती आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, दुधगंगा साखर कारखान्याचे चेअरमन माजी आम. के. पी. पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.