कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील संभाजीनगर येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या बस स्थानक कामाची पाहणी करून, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बस स्थानकाचं नाव श्री छत्रपती संभाजी महाराज नगर बसस्थानक, असे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे ही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. या अत्याधुनिक बसस्थानकामुळे राधानगरी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांसह नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील हे परिवहन राज्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरामधील संभाजीनगर येथील संभाजीनगर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 9कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

याबरोबरच जोतिबा बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 2 कोटीं, गगनबावडा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी, गडहिंग्लज बस स्थानकाच्या नुतणीकरणा साठी 2 कोटीं, कागल बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटीं, इचलकरंजी बस स्थानक नुतनीकरणासाठी 2 कोटीं यातून या बस स्थानकांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.