कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना काल दिनांक 2 जानेवारी रोजी कसबा बावडा येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत मारहाणीत जखमी झालेले चिटणीस यांनी आज शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत चिटणीस यांनी म्हटलं आहे की, संशयतांनी राजाराम कारखान्याच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग मनात धरुन ही मारहाण केली आहे. या घटनेदरम्यान चिटणीस यांच्या गळ्यातील दोन तोळ्याच्या चेनसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल गायब झाला आहे. तसंच संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचून हा हल्ला केला असल्याचं ही तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 25 संशयितांवर गुन्हा दाखल नोंद केला आहे.

यामध्ये माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार यांच्यासह मारहाण करणाऱ्यांमध्ये बबलू विश्वास नेजदार, युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, तुषार तुकाराम नेजदार कौस्तुभ कमलाकर नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, श्री प्रसाद संजय वराळे प्रवीण बाबुराव वराळे यांच्यावर गुन्हा नोंद करत 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.