I.N.D.I.A युतीला आणखी एक धक्का..! जम्मू-काश्मीरमध्ये युती संपली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A युतीला एकामागून एक अनेक धक्के बसत आहेत. कधी जागावाटपावर एकमत होत नाही तर कधी काँग्रेस नेते बाजू बदलत आहेत. आता जम्मू-काश्मीरमध्येही भारत आघाडीला झटका बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आता या आघाडीला धक्का दिला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी आपला पक्ष एकटाच लोकसभा निवडणूक लढवणार… Continue reading I.N.D.I.A युतीला आणखी एक धक्का..! जम्मू-काश्मीरमध्ये युती संपली

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित… Continue reading डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात

‘देशात जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा नवे वादळ बिहारमधून सुरू होते’

पाटणा ( वृत्तसंस्था ) जेव्हा जेव्हा देशात बदल झाले आहेत, तेव्हा बिहारमधील वादळाने याची सुरूवात होत नंतर ते उर्वरित राज्यांकडे सरकते बिहार हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. आज देशात विचारधारेचा लढा सुरू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा, अहंकार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेम आणि बंधुता आहे. असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.… Continue reading ‘देशात जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा नवे वादळ बिहारमधून सुरू होते’

माझ्या माध्यमातून झालेली 5 कोटींची कामे अमल महाडिकांमुळेच- आमदार महादेव जानकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 71, 73,74,80 आणि 81 या प्रभागांमध्ये विधान परिषद सदस्य आमदार महादेव जानकर यांच्या शिफारसीतून प्राप्त झालेल्या विशेष निधीतून तब्बल पाच कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज आमदार… Continue reading माझ्या माध्यमातून झालेली 5 कोटींची कामे अमल महाडिकांमुळेच- आमदार महादेव जानकर

हिमाचल काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग ?

शिमला ( उत्तर प्रदेश ) हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. प्रथम त्यांनी त्यांच्या फेसबुक बायोमधून त्यांचे अधिकृत पद काढून टाकले आणि आता त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले आहे. विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राजीनामा जाहीर केला होता पण राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी अद्याप तो स्वीकारलेला… Continue reading हिमाचल काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग ?

1993 साखळी बॉम्बस्फोट खटला; आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा निर्दोष..!

अजमेर ( वृत्तसंस्था ) बहुचर्चित शताब्दी एक्सप्रेस ट्रेन मालिका बॉम्बस्फोट 1993 प्रकरणात गुरुवारी अजमेर टाडा न्यायालयाने मोठा निर्णय दिला. यामध्ये 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. 1993 मध्ये 5 शहरांमध्ये झालेल्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी अब्दुल करीम टुंडा याची टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर… Continue reading 1993 साखळी बॉम्बस्फोट खटला; आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा निर्दोष..!

उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. मात्र कोल्हापूरची जागा आपल्याकडे हवी यासाठी उद्धवसेना आणि आता राष्ट्रीय काँग्रेसने देखील आपली ताकद पणाला लावली असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला असून, उद्धव सेना जिल्हा… Continue reading उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर गाठत राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. 2019 मध्येच लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी यांनी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. आता त्या राज्यसभेद्वारे राज्यसभेत प्रवेश करतील.… Continue reading माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. भाजपने आणखी एक यादी जाहीर केली असून त्यात चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नाव… Continue reading भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज चव्हाण यांनी शिक्का मोर्तब केलं आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद… Continue reading अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

error: Content is protected !!