मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज चव्हाण यांनी शिक्का मोर्तब केलं आहे.

अशोक चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. काही तासांपुर्वी त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवत आपण एका नव्या राजकीय वळणावर उभे असल्यांच म्हटलं होतं. त्यांनंतर आज त्यांनी आज घोषणा करताना म्हटलं आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की आज भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असून, यापुढे ही राज्याच्या विकासाकरता प्रयत्नशिल राहणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.