कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पूजा पाटील बोलत होत्या.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित रक्तदान आणि हिमोग्लोबल तपासणी शिबिराचे उद्घाटन पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर महिला प्राध्यापकांच्या मुलाखती असलेल्या विशेष न्यूज लेटरचे प्रकाशन पूजा ऋतुराज पाटील, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिम्पा शर्मा, सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम यांच्या करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, आपण लोकांना प्रेम दिले तर विविध मार्गाने आपल्यालाही प्रेमचा मिळते यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे सतत समाजाशी कमी राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन त्याच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे कोणत्या गोष्टीला गोष्टीचा दबाव न घेता स्वतःला प्रोत्साहन दिले तर आणखी वेगाने प्रगती होईल.

एक पत्नी, आई, सून आणि डी. वाय. पाटील ग्रुप मधील जबाबदाऱ्या असे मल्टी टास्किंग काम करत असताना आपल्या कुटुंबाची विशेषत: पती आमदार ऋतुराज पाटील यांची भक्कम साथ मिळत आहे. ते देत असलेल्या प्रोत्साहनमुळेचे चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये 300 हून अधिक विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्याची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 51 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आसावरी यादव, डॉ. स्नेहल शिंदे, प्रा. श्रुती काशीद यांनी केले. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या अधिकाऱ्याचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.