अजमेर ( वृत्तसंस्था ) बहुचर्चित शताब्दी एक्सप्रेस ट्रेन मालिका बॉम्बस्फोट 1993 प्रकरणात गुरुवारी अजमेर टाडा न्यायालयाने मोठा निर्णय दिला. यामध्ये 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. 1993 मध्ये 5 शहरांमध्ये झालेल्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी अब्दुल करीम टुंडा याची टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर इरफान आणि हमीदुद्दीन या दोन दहशतवाद्यांना दोषी ठरवले आहे.

हे प्रकरण 2014 पासून प्रलंबित होते. याप्रकरणी टुंडासह सुमारे 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. अजमेरच्या टाडा कोर्टाने गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी कुख्यात आरोपी सय्यद अब्दुल करीम टुंडा याची 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. टुंडावर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन बॉम्बस्फोट खटला 2024 पासून प्रलंबित होता. राजस्थानमधील सरकारी नोकरीसाठी पात्रतेसोबत कुटुंब नियोजनही आवश्यक आहे, जाणून घ्या सरकारी नोकरीच्या कोणत्या नियमाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

1993 ची ही दहशतवादी घटना काय होती ?

ही घटना 6 डिसेंबर 1993 रोजी राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली होती. दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बचा स्फोट केला होता. या घटनेला बाबरी मशीद पाडल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीचा बदला म्हणून संबोधण्यात आले. या प्रकरणी 17 आरोपींना पकडण्यात आले. यातील 3 जणांवर ( टुंडा, हमीदुद्दीन, इरफान अहमद ) गुरुवारी निकाल सुनावण्यात आला. हमीदुद्दीनला 10 जानेवारी 2010 रोजी, इरफान अहमदला 2010 नंतर आणि टुंडाला 10 जानेवारी 2014 रोजी नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती.