पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकीकडे वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे फॅड सर्वत्र झाले आहे. मात्र, कोणताही गाजावाजा न करता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज क्षीरसागर यांचा २३ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत पुष्कराजने सामाजिक बांधिलकी… Continue reading पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार…

इचलकरंजीत उद्यापासून व्यवसाय सुरु करणार : व्यापारी असोसिएशन

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी नागरिक मंच व्यापारी असोसिएशनने उद्या (सोमवार) पासून शहरातील दुकाने १० ते ४ या वेळेमध्ये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून  कारवाई झाल्यास सहपरिवार सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी दुकाने उघडत असल्याबाबतचे पत्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तातडीने देणाचा निर्णय असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. खा. धैर्यशील माने यांची भेट घेऊन… Continue reading इचलकरंजीत उद्यापासून व्यवसाय सुरु करणार : व्यापारी असोसिएशन

बालभारतीची पाठ्यपुस्तके मोफत वितरण करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश…

मुंबई (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे या वर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. यामुळे समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि  स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. ही पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा  प्रक्रिया द्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे. … Continue reading बालभारतीची पाठ्यपुस्तके मोफत वितरण करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश…

मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक महामारीच्या संकटाशी  आज प्रत्येकजण लढत आहे. आरोग्याविषयी काळजी घेत आर्थिक घडी रूळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. मात्र, या सर्व घटकांशी लढत जीवनाचे काही दिवस आनंदात जगू पाहणाऱ्या आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील अनाथांपासून ते वयोवृद्ध आजी – आजोबांना मदतीची अपेक्षा आहे.  दानशूरांनी वृद्धाश्रमाला साहाय्य करावे, असे आवाहन… Continue reading मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय मदतीचा हात…

ऐतिहासिक छ. शिवाजी पुलाची युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीने स्वच्छता…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी पूल आणि परिसराची स्वच्छता मोहीम युथ सोशल पॉवर ग्रुप आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उप-आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सध्या नवीन पर्यायी पूलामुळे कोल्हापूरची ओळख असलेल्या जुन्या छत्रपती शिवाजी पुलावरून होणारी वर्दळ बंद करण्यात आली आहे. त्यामूळे… Continue reading ऐतिहासिक छ. शिवाजी पुलाची युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीने स्वच्छता…

सोमवारपासून छ. शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाचा पहिला टप्पा सुरु…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महानगरपालिकेच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जूनपासून राजर्षी छ. शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे… Continue reading सोमवारपासून छ. शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाचा पहिला टप्पा सुरु…

शास्त्रीनगर मैदानाला आयुक्तांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शास्त्रीनगर मैदानाला भेट दिली. आयु्क्त बलकवडे यांना काका पाटील यांनी या मैदानाची कशा पद्धतीने  मैदानाची उभारणी करण्यात आली याची माहिती दिली. यावेळी आयुक्त बलकवडे यांनी, मी जेंव्हा मोबाईलवर पाहिले तेंव्हा हे मैदान खासगी असल्याचे वाटले होते. परंतु, हे मैदान कोल्हापूर महापालिकेचे आहे असे कळाल्यावर या… Continue reading शास्त्रीनगर मैदानाला आयुक्तांची भेट…

कलानगरी भजनी मंडळाने तयार केली कचरा वर्गीकरण आवाहनाची ध्वनिफीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या ॲटो टिप्पर द्वारे नागरिकांना कचरा वर्गीकरण करणेबाबत आवाहन करणारी ध्वनिफीत आरोग्य कर्मचारी व कलानगरी भजनी मंडळाचे अध्यक्ष लोकरत्न अमोल बुचडे यांनी तयार केली आहे. उपायुक्त निखिल मोरे यांनी त्यांच्या दालनात या ध्वनिफितीचे अनावरण केले. निखिल मोरे यांनी या ध्वनीफितीद्वारे नागरिकांत जागृती होऊन कचरा वेगवेगळा करता येईल अशी आशा व्यक्त केली. कलानगरी… Continue reading कलानगरी भजनी मंडळाने तयार केली कचरा वर्गीकरण आवाहनाची ध्वनिफीत

डॉक्टर्स डे निमित्त डॉ. अभिजीत जाधव यांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात जिल्ह्यामधील संपूर्ण आरोग्य विभाग कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. यामधे अनेक डॉक्टर्स दिवस रात्र कोरोनाबाधितांची सेवा करीत आहेत. संजीवन कोरोना केअर सेंटर (सोमवार पेठ, पन्हाळा) शासकीय कोरोना केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ. अभिजीत जाधव यांनी आपल्या सेवेने आत्तापर्यंत अनेक रुग्णांना बरे केलेले आहे. कोरोनामधून जीवदान मिळालेल्या दिगवडे गावच्या ऋषिकेश गुंड आणि इतर… Continue reading डॉक्टर्स डे निमित्त डॉ. अभिजीत जाधव यांचा सत्कार…

टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला चंदुर गावाकडील बाजूने टाकलेल्या भरावामुळे टाकळी भागातील शेतात नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी… Continue reading टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

error: Content is protected !!