खासगी इंग्रजी शाळांचा उद्या लाक्षणिक बंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाचे सदोष धोरण आणि विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा उद्या (दि. ७) लाक्षणिक बंद पाळणार आहेत. अशी माहिती इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश पोळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेल्या सदोष धोरणाबाबत राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून त्यासाठीच एक दिवस शाळा… Continue reading खासगी इंग्रजी शाळांचा उद्या लाक्षणिक बंद…

गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या : मनसेची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य जनतेची सहनशीलता संपली आहे. ‘अत्यावश्यक’च्या नावाखाली किराणा, बेकरी, मटण-चिकन आणि भाजीपाला बाजारातील गर्दी प्रशासनाला दिसत नाही. कोल्हापूरला वेगळा न्याय आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय का..? त्यामुळे गडहिंग्लजमधील सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना देण्यात आले.… Continue reading गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या : मनसेची मागणी

गांधीनगर भूमीअभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा : अमोल एकळ फाउंडेशनची मागणी

गांधीनगर (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केली आहे. आज (मंगळवार) जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. वसंतराव निकम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. गांधीनगर येथील भूमी अभिलेख कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. अनेकांच्या नोंदी, विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने मिळकतधारकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय कामांंसाठी… Continue reading गांधीनगर भूमीअभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा : अमोल एकळ फाउंडेशनची मागणी

केडीसीसी बँकेकडून आर्थिक साक्षरता कार्यक्रम प्रभावी : ए. वाय. पाटील  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, डोंगर कपारीतील वाड्या-वस्त्यांवर आर्थिक साक्षरतेची फार मोठी गरज आहे. केडीसीसी बँकेच्यावतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले. ते राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे आर्थिक डिजिटल जागृती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव होते.       यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले… Continue reading केडीसीसी बँकेकडून आर्थिक साक्षरता कार्यक्रम प्रभावी : ए. वाय. पाटील  

राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आनंदोत्सव अन् जागरण रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने रविवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच असा निर्धार केलेल्या ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ने आज (सोमवार) आंदोलनाऐवजी आनंदोत्सव साजरा केला. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यासाठी रॅलीचे आयोजन केले. लॉकडाऊनचे अन्यायी निर्बंध शिथिल करून तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व्यापार… Continue reading राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आनंदोत्सव अन् जागरण रॅली

कोल्हापुरातील कुंभार समाजाला गणेशोत्सव काळात दिलासा द्या : भाजपची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून कुंभार समाजाची अवस्था बिकट बनली आहे. त्यातच गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असता सरकारने मंडळांच्या मूर्ती ४ तर घरगुती २ फूट उंचीच्या असाव्यात असे निर्बंध घातले आहेत. यामुळे कुंभार व्यावसायिक आणखी अडचणीत आले आहेत. या समाजाचे कोरोना काळात आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हेतूने मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द… Continue reading कोल्हापुरातील कुंभार समाजाला गणेशोत्सव काळात दिलासा द्या : भाजपची मागणी

इचलकरंजीत सनियंत्रण समितीच्या बैठकीत वादावादी, शिवीगाळ… (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील व्यवसाय सुमारे ९० दिवसांपासून बंद आहेत. मात्र, तीव्र जनभावना लक्षात घेऊन आजपासून (सोमवार) कोल्हापूर शहरातील दुकाने उघडण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सनियंत्रण बैठकीत व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी अभिजित पटवा आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यात… Continue reading इचलकरंजीत सनियंत्रण समितीच्या बैठकीत वादावादी, शिवीगाळ… (व्हिडिओ)

एमपीएससीच्या सर्व जागा ३१ जुलैपर्यंत भरणार : उपमुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : स्वप्निल लोणकर आत्महत्येचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पडले. यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीच्या सर्व जागा ३१ जुलै पर्यंत भरणार असल्याची घोषणा केली.  यावेळी अजित पवार यांनी अधिवेशनात निवेदन सादर केले. तसेच स्वप्निल लोणकरची आत्महत्या ही दुर्दैवी घटना होती. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आपण सर्वांना… Continue reading एमपीएससीच्या सर्व जागा ३१ जुलैपर्यंत भरणार : उपमुख्यमंत्री

उद्यापासून कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू होणार – पालकमंत्री

कोल्हापूर प्रतिनिधी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री  यांनी आठ दिवसासाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले आहेत. उद्या सोमवार (दि.५ जुलै ) पासून  अत्यावश्यक सेवांबरोबरच  इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. ही परवानगी सोमवार ५ जुलै  ते शुक्रवार ९ जुलै या कालावधीमध्ये सकाळी ७ ते… Continue reading उद्यापासून कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू होणार – पालकमंत्री

दुकानं उघडली तर कारवाई करणारच : पोलिसांची व्यापाऱ्यांना नोटीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा व्यापारी असोसिएशनने शहरातील व्यापाऱ्यांना सोशल मिडियाद्वारे बंद असलेले व्यापार सुरु करावेत असे आवाहन केले होते. त्यानुसार आज (रविवार) शहरातील गुजरी आणि राजारामपूरी येथे सर्व व्यापारी आणि कामगारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या (सोमवार) पासून आपले व्यवसाय सकाळी ९ ते ४ या वेळेत सुरु ठेवावीत असा निर्णय घेण्यात आला.… Continue reading दुकानं उघडली तर कारवाई करणारच : पोलिसांची व्यापाऱ्यांना नोटीस

error: Content is protected !!