कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकीकडे वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे फॅड सर्वत्र झाले आहे. मात्र, कोणताही गाजावाजा न करता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज क्षीरसागर यांचा २३ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत पुष्कराजने सामाजिक बांधिलकी जपली आहे. पुष्कराजने आपल्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार) नो मर्सी ग्रुप आणि युवा सेनेच्या वतीने शहरातील सुमारे १०० गोरगरीब रिक्षा व्यावसायिक आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याच्या कीटचे वाटप केले. या कीटमध्ये तांदूळ, गहू, खाद्यतेल, तुरडाळ, मसुरा, साखर, चहापुड, मसाले आदी वस्तूंचा समावेश आहे.

नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  ऋतुराज क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांच्या वतीने लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. या कोरोनाच्या काळातही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, नो मर्सी ग्रुपचे रोहन घोरपडे, दिग्विजय साळुंखे, करण पोतदार, रोहित मेळवंकी, ओंकार वाले, करण मिरजकर, राजअहमद सय्यद, यश काळे, विराज चव्हाण, अमेय अतिग्रे, शिवसेनेचे अरुण सावंत, रणजीत जाधव, जयवंत हारुगले, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.