कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या ॲटो टिप्पर द्वारे नागरिकांना कचरा वर्गीकरण करणेबाबत आवाहन करणारी ध्वनिफीत आरोग्य कर्मचारी व कलानगरी भजनी मंडळाचे अध्यक्ष लोकरत्न अमोल बुचडे यांनी तयार केली आहे. उपायुक्त निखिल मोरे यांनी त्यांच्या दालनात या ध्वनिफितीचे अनावरण केले.

निखिल मोरे यांनी या ध्वनीफितीद्वारे नागरिकांत जागृती होऊन कचरा वेगवेगळा करता येईल अशी आशा व्यक्त केली. कलानगरी भजनी मंडळातर्फे मोरे यांचा राजर्षी शाहू महाराज यांची मूर्ती, शाल व फेटा देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, कलानगरीचे उपाध्यक्ष प्रशांत श्रीप्पान्नावर, तृप्ती भोसले, बेबी नाईक, लक्ष्मण सुतार, ओकांर सुतार, संदीप वायचळ, अवधूत पाटोळे आदी उपस्थित होते.