इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी नागरिक मंच व्यापारी असोसिएशनने उद्या (सोमवार) पासून शहरातील दुकाने १० ते ४ या वेळेमध्ये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून  कारवाई झाल्यास सहपरिवार सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी दुकाने उघडत असल्याबाबतचे पत्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तातडीने देणाचा निर्णय असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. खा. धैर्यशील माने यांची भेट घेऊन असोसिएशनच्या मागण्या आणि निर्णय कळवण्यात आला आहे. आ. प्रकाश आवाडे आणि नगराध्यक्षा अलका स्वामी यांनाही पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे इनाम व्यापारी असोसिएशनच्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या दुकाने सुरू करण्याच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे.