जांभळी गावामधील तरुणांनी दिला निराधाराला आधार…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी-टाकवडे मार्गावर रात्रीच्या सुमारास गावातील काही तरुणांना एक निराधार व्यक्ती आढळून आली. तेथील युवासेना शहर अधिकारी सोन्या माळी, विशाल गायकवाड, ऋषिकेश भगत, अनिकेत जाधव आदी युवकांनी या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली असता ही व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असल्याचे समजले. या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत या व्यक्तीची गावातील शाळेमध्ये राहण्याची सोय… Continue reading जांभळी गावामधील तरुणांनी दिला निराधाराला आधार…

संजीवनच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौर उर्जेवर चालणारी ‘इलेक्ट्रिक थंडर बाईक’…

पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन शिक्षण समूहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सौर उर्जेवर चालणारी थंडर बाईक टू व्हीलर बनवली आहे. ही दुचाकी अडीच तास चार्जिंग केल्यावर ८० ते १०० किलोमीटर अंतर कापणार आहे. या गाडीला ७२ होल्ट एंपियर लिथियम आर्यन बॅटरी वापरली असून बीएलडीसी मोटर चेन, पॉवर ट्रान्समिशन आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत गाडी जर डिस्चार्ज… Continue reading संजीवनच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौर उर्जेवर चालणारी ‘इलेक्ट्रिक थंडर बाईक’…

गणेशोत्सवावरील निर्बंधाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे, मात्र त्याला आम आदमी पार्टीने विरोध केला आहे. ‘आपला गणेशोत्सव – आपला लढा’ ही मोहीम जाहीर करीत या मोहिमेद्वारे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळे, तालीम संस्थांच्या बैठका घेऊन या निर्बंधाविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ‘आप’चे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष – संदीप देसाई यांनी… Continue reading गणेशोत्सवावरील निर्बंधाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार : ‘आप’चा इशारा

वीजबील वसुलीसाठीचा तगादा थांबवावा अन्यथा : ‘आप’चा महावितरण इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्राहकांकडे वीजबिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करत असल्याचे समोर येत आहे. वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी असे वर्तन न थांबवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष… Continue reading वीजबील वसुलीसाठीचा तगादा थांबवावा अन्यथा : ‘आप’चा महावितरण इशारा

मुरगूड दुय्यम निबंधक कार्यालयाला स्वतंत्र जागा द्यावी : मुद्रांक विक्रेत्यांची मागणी

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड येथे गेली अनेक वर्ष नगर परिषदेच्या अपुऱ्या जागेत दुय्यम निबंधक कार्यालयाचे काम सुरु आहे. त्याला शासकीय स्वतंत्र जागा द्यावी, अशी मागणी अशी मागणी खा. संजय मंडलीक यांच्याकडे मुद्रांक विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी खा. मंडलीक यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, दुय्यम निबंधक श्रेणी-… Continue reading मुरगूड दुय्यम निबंधक कार्यालयाला स्वतंत्र जागा द्यावी : मुद्रांक विक्रेत्यांची मागणी

महापालिकेकडून घरफाळा ६ टक्के सवलत योजनेस मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (घरफाळा) भरण्यासाठी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. महानगरपालिकेने मंजूर धोरणानुसार दिनांक ३० जूनअखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये… Continue reading महापालिकेकडून घरफाळा ६ टक्के सवलत योजनेस मुदतवाढ

शेतकरी, व्यापाऱ्यांना घरफाळा, वीजबिलात सूट द्या : अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक वेळा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनता असे घटक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना वीजबिल आणि घरफाळा यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली. महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे की,… Continue reading शेतकरी, व्यापाऱ्यांना घरफाळा, वीजबिलात सूट द्या : अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इचलकरंजीत डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा… : शिवसेनेचा इशारा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आधीच कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या इचलकरंजीवासियांना आता डेंग्यूचा सामना करणे भाग पडले आहे. शहरात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून १६४ जणांना त्याची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. डेंग्यूचा फैलाव रोख्ण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हाला… Continue reading इचलकरंजीत डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा… : शिवसेनेचा इशारा

दुष्काळात तेरावा महिना ! किणी, तासवडे नाक्यावरील टोल दरामध्ये वाढ

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मागील वर्षांपासून सर्व क्षेत्र अडचणीत आहेत. तर दुसरीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरातील जबर वाढीने आधीच वाहनधारक वैतागले असताना त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. कोल्हापूर आणि सातारा दरम्यान असणाऱ्या किणी, तासवडे या दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. उद्या (बुधवार) एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार… Continue reading दुष्काळात तेरावा महिना ! किणी, तासवडे नाक्यावरील टोल दरामध्ये वाढ

केडीसीसी बँकेने आजरा साखर कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा सहकारी साखर कारखान्याचा ताबा कारखान्याच्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. कारखान्यांने थकित कर्जापोटीची ७० कोटी रुपये रक्कम भरली. यामुळे कारखान्याला नवीन कर्ज मिळण्यासह हा हंगाम सुरू होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. केडीसीसी बँकेने साखर कारखान्याकडून कर्ज परतफेड थकल्यामुळे आजरा साखर कारखान्याचा ताबा घेतला होता. सेक्युरिटायजेशन ॲक्ट… Continue reading केडीसीसी बँकेने आजरा साखर कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला…

error: Content is protected !!