कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात जिल्ह्यामधील संपूर्ण आरोग्य विभाग कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. यामधे अनेक डॉक्टर्स दिवस रात्र कोरोनाबाधितांची सेवा करीत आहेत. संजीवन कोरोना केअर सेंटर (सोमवार पेठ, पन्हाळा) शासकीय कोरोना केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ. अभिजीत जाधव यांनी आपल्या सेवेने आत्तापर्यंत अनेक रुग्णांना बरे केलेले आहे.

कोरोनामधून जीवदान मिळालेल्या दिगवडे गावच्या ऋषिकेश गुंड आणि इतर तरुणांनी आपल्या डॉक्टरांप्रती आभार म्हणून डॉ. जाधव यांचा संजीवन कोरोना केअर सेंटर पन्हाळा येथे सत्कार केला. तर आर्थिक परिस्थिती बिकट असरणाऱ्या कोरोनाबाधितांनी मोफत अशा शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.