झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्याखेरीज करिअरमध्ये यशस्वी होता येत नाही,’ असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले. येथील शासकीय तंत्रनिकेतन, हस्तकला विभाग व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने फॅशन ज्वेलरी आणि मेटलवेअर कास्टिंग टेक्निशियन या दोन अभ्यासक्रमांचे उदघाटन भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलन्स… Continue reading झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एसटीची वाहतूक आजपासून पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारातून आज (शुक्रवार) सकाळपासून एसटी पूर्ण आसन क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय एसटीमध्ये कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जात नाही. राज्यात मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल… Continue reading एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू

ह्दया कोविड रूग्णालयाचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हृदया कॅन्सर सेंटरमध्ये कोव्हिड रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यांचे उदघाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते फित कापून झाले. रूग्णालयामुळे परिसरातील कोरोना बाधित रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सोय झाली आहे, असे सांगून उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.  डॉ. सुरेखा चौगुले यांनी रूग्णालयाची माहिती… Continue reading ह्दया कोविड रूग्णालयाचे उद्घाटन

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ठिकठिकाणी दोन दिवसांपासून तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप पिकांच्या काढणीला गती आली आहे. सोयाबीन काढणीची धांदल सुरू आहे. यामुळे गावांगावांतील शिवारे पुन्हा एकदा गर्दीने फुलून जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा तालुक्यात पाऊस झाला नाही. पण… Continue reading जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

महाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी … Continue reading महाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार

सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…

मुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता बहुजन कल्याण विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते. त्यानंतर बैठकीत सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आदेश निघाला. दरम्यान १३ टक्के… Continue reading सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…

मुंबईत पुन्हा एकदा संचारबंदी!

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुंबई पोलिसांची ही ऑर्डर नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल… Continue reading मुंबईत पुन्हा एकदा संचारबंदी!

error: Content is protected !!