कोल्हापूर (प्रतिनिधी) : युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी पूल आणि परिसराची स्वच्छता मोहीम युथ सोशल पॉवर ग्रुप आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उप-आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

सध्या नवीन पर्यायी पूलामुळे कोल्हापूरची ओळख असलेल्या जुन्या छत्रपती शिवाजी पुलावरून होणारी वर्दळ बंद करण्यात आली आहे. त्यामूळे या पुलावर झाडे-झुडपे आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. या मोहिमे अंतर्गत या ठिकाणची स्वच्छता करण्यात असून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न या ग्रुपच्या वतीने करण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, युथ सोशल पॉवर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.