दहावी निकाल : कोकण सुसाट, मुलींची बाजी, उत्तीर्ण ९६.९४ टक्के

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९  टक्के अधिक… Continue reading दहावी निकाल : कोकण सुसाट, मुलींची बाजी, उत्तीर्ण ९६.९४ टक्के

उद्या दहावी परीक्षेचा निकाल

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे शुक्रवार, दि. १७ जून  रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. दहावीच्या परीक्षेसाठी… Continue reading उद्या दहावी परीक्षेचा निकाल

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये शह-काटशह

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका विधानपरिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसने नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या… Continue reading विधानपरिषदेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये शह-काटशह

मोदींचा हात अजितदादांच्या खांद्यावर

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांचे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही स्वागताचा स्वीकार करत अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री… Continue reading मोदींचा हात अजितदादांच्या खांद्यावर

पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

पुणे (प्रतिनिधी) : पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ११०० कोटींचा खर्च करण्याबरोबर या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते. पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, संत तुकाराम… Continue reading पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहू दौऱ्यावर

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहू दौऱ्यावर

पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी) :  एका ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने पुण्यात आलेल्या २१ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बसचालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे.  वाशीम येथून पुण्यात आलेले हे दाम्पत्य काम शोधत होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड… Continue reading पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

मुंबई, कोकणसह राज्यभर पावसाचे आगमन

मुंबई : अखेर आज (शनिवारी) मान्सूनने राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल झाला आहे. शुक्रवारी तळकोकणात… Continue reading मुंबई, कोकणसह राज्यभर पावसाचे आगमन

कोकणात पाऊस दाखल

पुणे (प्रतिनिधी) : मान्सून कोकणात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसात हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दिवसभर पुणे शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता. सकाळी स्वच्छ… Continue reading कोकणात पाऊस दाखल

जुन्नरमध्ये शनिवारपासून द्राक्ष महोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्यमहोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती सुप्रिया करमरकर, उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर), पर्यटन संचालनालय पुणे… Continue reading जुन्नरमध्ये शनिवारपासून द्राक्ष महोत्सव

error: Content is protected !!