पुणे (प्रतिनिधी) :  एका ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने पुण्यात आलेल्या २१ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बसचालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

वाशीम येथून पुण्यात आलेले हे दाम्पत्य काम शोधत होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. तेवढ्यात ट्रॅव्हल्सचा बसचालक नवनाथ शिवाजी भोग याने पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा. एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार? असे त्यांनी सांगितले. त्या बसचालकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दोघे जण बसमध्ये आराम करण्यास गेले. काही वेळाने पीडित महिलेचा पती लघुशंका करण्यासाठी गेला असता, बसचालकाने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि ‘तू जर आरडाओरड केल्यास तुला जीवे मारेन,’ अशी धमकी दिली.

स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉपजवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला पकडले असून, पुढील तपास सुरू आहे.