पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांचे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदींनीही स्वागताचा स्वीकार करत अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला असून, राजकीय वर्तुळात या फोटोची चर्चाही सुरू झाली आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय चित्र बदलणार का? अशी चर्चा रंगली आहे.