पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे शुक्रवार, दि. १७ जून  रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६  लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुले असून, मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६  लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९  हजार ५८४  मुलांनी, तर ७ लाख ४९ हजार ४८७  मुलींनी परीक्षा दिली होती.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर उद्या शुक्रवारी दुपारी १ नंतर उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.