…तर असे घडले नसते : संभाजीराजे छत्रपती

पुणे (प्रतिनिधी) : मला उमेदवारी दिली असती तर हे घडले नसते, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीनी दिली आहे. राज्यात प्रचंड वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडीवर संभाजीराजे छत्रपती यांनीही भाष्य केले आहे. पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे हे बोलत होते. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे, असेही संभाजीराजे म्हणाले… Continue reading …तर असे घडले नसते : संभाजीराजे छत्रपती

भाजपचे दोन्ही आजारी आमदार मतदान करणार

पुणे (प्रतिनिधी) : दुर्धर आजाराशी लढा देणारे चिंचवड येथील लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या मुक्ता टिळक हे दोन्ही भाजपचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीतही मतदान करणार आहेत. तब्बल ५० दिवस दुर्धर आजाराशी लढून नुकतेच घरी परतलेले आ. लक्ष्मण जगताप हे राज्यसभा निवडणुकीत डॉक्टरांनी सूचना करूनही पक्षासाठी मतदानाला रुग्णवाहिकेतून मुंबईला गेले होते. शनिवारी भाजपच्या बैठकीतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,… Continue reading भाजपचे दोन्ही आजारी आमदार मतदान करणार

वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.… Continue reading वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम

दहावी निकाल : कोकण सुसाट, मुलींची बाजी, उत्तीर्ण ९६.९४ टक्के

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९  टक्के अधिक… Continue reading दहावी निकाल : कोकण सुसाट, मुलींची बाजी, उत्तीर्ण ९६.९४ टक्के

उद्या दहावी परीक्षेचा निकाल

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे शुक्रवार, दि. १७ जून  रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. दहावीच्या परीक्षेसाठी… Continue reading उद्या दहावी परीक्षेचा निकाल

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये शह-काटशह

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका विधानपरिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसने नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या… Continue reading विधानपरिषदेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये शह-काटशह

मोदींचा हात अजितदादांच्या खांद्यावर

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांचे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही स्वागताचा स्वीकार करत अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री… Continue reading मोदींचा हात अजितदादांच्या खांद्यावर

पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

पुणे (प्रतिनिधी) : पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ११०० कोटींचा खर्च करण्याबरोबर या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते. पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, संत तुकाराम… Continue reading पालखी मार्गांच्या विकासासाठी ११०० कोटींचा निधी : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहू दौऱ्यावर

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहू दौऱ्यावर

पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी) :  एका ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने पुण्यात आलेल्या २१ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बसचालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे.  वाशीम येथून पुण्यात आलेले हे दाम्पत्य काम शोधत होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड… Continue reading पुण्यात बसचालकाकडून महिलेवर बलात्कार

error: Content is protected !!