कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

पुणे (प्रतिनिधी) : महिनाभरापूर्वी आपल्या चालकाकडे लिफाफ्यात सुसाईट नोट देऊन गायब झालेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर आज (मंगळवार) दुपारी राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप सापडले. ते कोल्हापूर येथे काहीजणांना दिसल्याने पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजमध्ये चौकशी केली होती. ते मोठे उद्योजक असल्याने आणि त्यांच्या बेपत्तामागे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी व्यापकपणे तपास मोहीम… Continue reading कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..!

पुणे (प्रतिनिधी) : नुकतीच कोरोना रुग्णांची संख्येत घट होत होती. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेने शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली.  याबरोबरच मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील… Continue reading पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..!

‘त्या’ म्हणतात, भाजपकडून निरोप नाही

पुणे (प्रतिनिधी) : भाजपकडून मला हल्ली बैठका आणि आंदोलनासाठी निरोप दिले जात नसल्याचे सांगत कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात. त्याचाही निरोप दिला जात नाही. आजच्या आंदोलनाचाही मला निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे… Continue reading ‘त्या’ म्हणतात, भाजपकडून निरोप नाही

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या… Continue reading केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

नवरात्रोत्सव पहिला दिवस : श्री अंबाबाईची पूजा ‘कुंडलिनी’ स्वरूपात !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून (शनिवार) प्रारंभ झालाय. घटस्थापनेच्या दिवशी श्री अंबाबाईची महापूजा श्री कुंडलिनी रूप पराम्बिकेच्या स्वरुपात बांधण्यात आली आहे. पराम्बा अर्थात वाणी शब्द याला अनाकलनीय असं भगवतीचं रूप. अशी ही जगदंबा जिने त्रिनेत्र आणि दोन हाताचं रूप धारण करून एका हातामध्ये  रत्नजडित मधुपात्र आणि… Continue reading नवरात्रोत्सव पहिला दिवस : श्री अंबाबाईची पूजा ‘कुंडलिनी’ स्वरूपात !

जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित… Continue reading जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर पुढील १२ आठवड्यांसाठी म्हणजे ३ महिन्यांसाठी ‘बार्क’ने (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) टीआरपीवर बंदी आणली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बार्कने आपल्या तांत्रिक… Continue reading टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार सद्स्यांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचे समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, २४… Continue reading ‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

मुंबईतील ‘बत्ती गुल’वरून ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक विधान !

मुंबई (प्रतिनिधी) : सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाले होते. पण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे धक्कादायक ट्विट केले आहे. सोमवार दिनांक 12.10.20… Continue reading मुंबईतील ‘बत्ती गुल’वरून ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक विधान !

नोव्हेंबरमधील ‘एमपीएससी’ परीक्षाही पुढे ढकला : विनायक मेटे

नाशिक (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘एमपीएससी’ची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. ते म्हणाले… Continue reading नोव्हेंबरमधील ‘एमपीएससी’ परीक्षाही पुढे ढकला : विनायक मेटे

error: Content is protected !!