गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

मनमाड (प्रतिनिधी) :  गणेश मंडळाकडून प्रत्येक वर्षी श्री गणेशाची स्थापना चक्क मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रेल्वेमध्ये केली जाते. यंदाही गणेश भक्तांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली आहे. मनमाड रेल्वे जंक्शन हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून, या रेल्वे स्थानकातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. गणेशोत्सवाच्या काळामध्ये चक्क श्री गणेश मनमाड ते मुंबई… Continue reading गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

गणेशोत्सवात गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला

सोलापूर (प्रतिनिधी) : अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी सकाळी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कळसाला २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला होता. सुमारे २५ किलो वजनाचा हा कळस असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा हा… Continue reading गणेशोत्सवात गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला

पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

पुणे (प्रतीनिधी) : पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत झाली. ढोल ताशांच्या गजरात दोन वर्षांनी बाप्पा विराजमान झाले आहेत. मानाचा पहिला श्री कसबा गणपती येथील मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते बप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’च्या… Continue reading पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

पुण्यातील अफझल खान वधाच्या देखाव्याचा वाद पेटणार

मुंबई/पुणे : अफझल खानाचा वधाच्या सजीव देखाव्याचा वाद आता राजकीय पटलावर रंगणार असे दिसत आहे. पुण्यातील एका गणपती मंडळाने अफझल खानाचा वध हा देखावा साकारण्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असल्याने पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या नकाराचे पडसाद सर्व राज्यात उमटताना दिसत आहेत.  शिंदे-फडणवीस सरकारकडून वारंवार हिंदुत्ववादी… Continue reading पुण्यातील अफझल खान वधाच्या देखाव्याचा वाद पेटणार

फडणवीस यांच्या लोकसभा उमेदवारीवर काय म्हणाले संभाजीराजे ?

मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केल्यानंतर चर्चेला ऊत आला आहे. फडणवीस यांची पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये निवड झाल्यानंतर ही मागणी पुढे आल्याने या चर्चेला वेगळा रंग आला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी… Continue reading फडणवीस यांच्या लोकसभा उमेदवारीवर काय म्हणाले संभाजीराजे ?

मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचे पत्नी ज्योती मेटे यांनी म्हटले होते. दरम्यान, आज मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत गाडीच्या चालकाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.… Continue reading मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश

मंत्रिमंडळ विस्तार लवकर म्हणजे कधी होणार :अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकर म्हणजे कधी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, वेगवेगळी संकट येतात, अनेक घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत, पालकांसमोर अनेक… Continue reading मंत्रिमंडळ विस्तार लवकर म्हणजे कधी होणार :अजित पवार

अखेरच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

पुणे (प्रतिनिधी) :  न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना  परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव… Continue reading अखेरच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या : मुख्यमंत्री

पुणे (प्रतीनिधि) : प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल, अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन… Continue reading केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या : मुख्यमंत्री

दहावी, बारावी फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून

पुणे: महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्‍यासाठीची प्रक्रिया शुक्रवार (दि.२९) पासून सुरु होत असून, २४ ऑगस्‍टपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. शिक्षण मंडळातर्फे सविस्‍तर वेळापत्रक… Continue reading दहावी, बारावी फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून

error: Content is protected !!