पुणे (प्रतिनिधी) : मला उमेदवारी दिली असती तर हे घडले नसते, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीनी दिली आहे. राज्यात प्रचंड वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडीवर संभाजीराजे छत्रपती यांनीही भाष्य केले आहे.

पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे हे बोलत होते. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे, असेही संभाजीराजे म्हणाले आहेत. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगले चालावे आमचे एवढेच मत आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.