जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या शहर आणि गावांमध्ये कमी आहे. अशा ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज (बुधवार) सकाळी भेट घेतली असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.   ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसमोर व्यवसाय बंद… Continue reading जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६२ हजार ५०० लसींचे डोस उपलब्ध : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी ६ जुलैरोजी ६२ हजार ५०० कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या पात्र नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे आम्ही जिल्ह्यातील तीन ही मंत्री सातत्याने प्रयत्नशील… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६२ हजार ५०० लसींचे डोस उपलब्ध : पालकमंत्री

क्षुल्लक कारणावरून गडमुडशिंगी येथे परप्रांतीय मजुराचा खून…

गांधीनगर (प्रतिनिधी) : घरभाडे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा परप्रांतीय मजुरांनी आपल्याच सहकारी मजुराचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील शांतीप्रकाश झोपडपट्टीत घडला आहे. राजू पातलिया मुजालदा (वय ३०, मूळ रा. सेमलखुट पो. हेलापडवा ता. झिरन्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास… Continue reading क्षुल्लक कारणावरून गडमुडशिंगी येथे परप्रांतीय मजुराचा खून…

खासगी इंग्रजी शाळांचा उद्या लाक्षणिक बंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाचे सदोष धोरण आणि विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा उद्या (दि. ७) लाक्षणिक बंद पाळणार आहेत. अशी माहिती इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश पोळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेल्या सदोष धोरणाबाबत राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून त्यासाठीच एक दिवस शाळा… Continue reading खासगी इंग्रजी शाळांचा उद्या लाक्षणिक बंद…

कोल्हापूर शहराप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. त्यांनी आज (मंगळवार) मुंबई येथे पालकमंत्री सतेज पाटील यांना भेटून याबाबतचे निवेदन सादर केले. गांधी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील… Continue reading कोल्हापूर शहराप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या…

हलकर्णीतील तरुणाचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील नोकरी निमित्य गोव्यात असणाऱ्या तरुणाचा रविवार (दि. ४) रोजी सायंकाळी समुद्रात बुडून अंत झाला होता. अनवश शौकत ताशिलदार (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, अनवश हा गेल्या तीन वर्षापासून गोवा येथील एका कंपनीत नोकरीला होता. रविवारी… Continue reading हलकर्णीतील तरुणाचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू…

गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या : मनसेची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य जनतेची सहनशीलता संपली आहे. ‘अत्यावश्यक’च्या नावाखाली किराणा, बेकरी, मटण-चिकन आणि भाजीपाला बाजारातील गर्दी प्रशासनाला दिसत नाही. कोल्हापूरला वेगळा न्याय आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय का..? त्यामुळे गडहिंग्लजमधील सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना देण्यात आले.… Continue reading गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या : मनसेची मागणी

जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४२८ तर करवीर तालुक्यात ३३१ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४२८, आजरा- १०१, भुदरगड- ३७, चंदगड- २०, गडहिंग्लज- ५३, गगनबावडा… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम…

‘ऑक्सफॅम इंडिया’कडून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी ८ लाखांची औषधे, साहित्य प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी राज्याचे संचालक-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा व कोविड -१९ पुणे विभागीय जनजागृती समिती अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सहकार्यातून ऑक्सफॅम इंडिया यांच्याकडून सुमारे ८ लाखांची औषधे आणि साहित्य प्रदान करण्यात आले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्सफॅम इंडिया यांनी Oxygen Flow Meter, Oxygen Nasal… Continue reading ‘ऑक्सफॅम इंडिया’कडून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी ८ लाखांची औषधे, साहित्य प्रदान

गोकुळ दूधसंघाच्या शासननियुक्त संचालकपदी शिवसेनेचे मुरलीधर जाधव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गोकुळ दुधसंघाच्या शासननियुक्त संचालक पदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आज (मंगळवार) जारी करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचे असलेले मुरलीधर जाधव गेल्या वीस वर्षांपूहन अधिक काळ शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आज गोकुळ दुधसंघाच्या… Continue reading गोकुळ दूधसंघाच्या शासननियुक्त संचालकपदी शिवसेनेचे मुरलीधर जाधव…

error: Content is protected !!