कोल्हापूरचे उपमहापौर सुभाष पाटील यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या माजी उपमहापौर सुभाष श्रीपती पाटील यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. सुभाष पाटील हे १९८४ साली लक्षतीर्थ वसाहत प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची १९८६ साली महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली होती. मेजर विलासराव पाटील यांचे… Continue reading कोल्हापूरचे उपमहापौर सुभाष पाटील यांचे निधन

शिरोळमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल यात्रा…

शिरोळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,  खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावा या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (मंगळवार) शिरोळ येथे सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी शिरोळ तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्यावतीने तहसिलदार अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात… Continue reading शिरोळमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल यात्रा…

उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून गारगोटीसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. पण गारगोटी येथील दुकानांची शटर्स ओपन होतील या आशेवर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकाना पुन्हा आता पाच दिवस कडक लॉकडाउनला सामोरे जावे लागणार आहे. बुधवार (दि.१४) ते रविवार (दि.१८) जुलैपर्यंत गारगोटी परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये आता तिव्र… Continue reading उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील वरदविनायक बोट क्लबने महापूराच्या काळात सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात दिला आहे. या क्लबने अडचणीतून मार्ग काढत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. यासाठी मदतीचा हात म्हणून या क्लबला जवाहर साखर कारखान्याच्यावतीने यांत्रिक बोट देण्यात आली असल्याचे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले.  इचलकरंजीचा कबड्डी, खो-खो बरोबरच रोईंग क्रीडा प्रकारातही नावलौकिक होत… Continue reading इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

रसिका पाटील यांच्या सभापतीपदी निवडीने शिंगणापुरात जल्लोष…

शिंगणापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सदस्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. महिला व बालकल्याण समिती, बांधकाम, समाजकल्याण आणि शिक्षण व अर्थ समिती या चार महत्त्वपूर्ण समित्यांच्या सभापतीपदी महिलांना संधी मिळाली. विशेष म्हणजे शिंगणापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या अपक्ष सदस्य रसिका… Continue reading रसिका पाटील यांच्या सभापतीपदी निवडीने शिंगणापुरात जल्लोष…

‘गरज सरो वैद्य मरो’ हेच ‘बिद्री’च्या सत्ताधारी आघाडीचे धोरण : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

गारगोटी (प्रतिनिधी) : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याने कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रणच दिले नाही. यावरून सत्तारूढ आघाडीचे ‘गरज सरो व वैद्य मरो’ हे धोरण निदर्शनास येत असल्याची टीका भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री… Continue reading ‘गरज सरो वैद्य मरो’ हेच ‘बिद्री’च्या सत्ताधारी आघाडीचे धोरण : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : माजी भारतीय क्रिकेटर आणि १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशपाल शर्मा यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यशपाल शर्मा यांनी १९८३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्याच सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली होती. तर… Continue reading भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन…

जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे लक्ष लागून असतानाच सभापती पदासाठीच्या नावावर अखेर शिकामोर्तब झाले. चारही सभापतीपदे महिलांना देण्यात आल्याने विषय समित्यांवर महिलाराज असणार आहे हे निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी काल (सोमवार) पार पडल्या. यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने विषय… Continue reading जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन राहून समाधीस्थळावरती नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, सयाजी झुंजार, भिमराव काशिद, भगवान चित्ते यांच्या हस्ते नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजन करणेत आले. यावेळी स्वामीनिष्ठ शिवा काशीद यांच्या जयजयकारांच्या घोषणाही देण्यात… Continue reading पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक नागरीकाने या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेली कोल्हापूर उत्तर विधानसभा… Continue reading शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

error: Content is protected !!