‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म मानाचा,  म महानतेचा, म मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. या गाण्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार आणि रंजक झाले आहे. या गीताच लेखन समीर सामंत यांचे… Continue reading ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

पन्हाळा गिरीस्थानच्या उपनगराध्यक्षपदी पल्लवी नायकवडी बिनविरोध…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पल्लवी नायकवडी यांची आज (गुरुवार) बिनविरोध निवड करण्यात आली. नगपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले. पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आदी महत्त्वाची पदे जनसुराज्य पक्षाकडे… Continue reading पन्हाळा गिरीस्थानच्या उपनगराध्यक्षपदी पल्लवी नायकवडी बिनविरोध…

कोल्हापूरात मातेचा निर्घुण खून करणाऱ्या क्रूरकर्मा मुलाला फाशीची शिक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  त्या व्यसनी तरुणाने दारुला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि काळजासह अक्षरशः भाजून खाल्ले. आपल्या जन्मदात्या आईशी इतके राक्षसी कृत्य करणारा क्रूरकर्मा आहे. कोल्हापूरातील कावळा नाका परिसरात राहणारा सुनिल रामा कुचीकोरवी तर यल्लव्वा रामा कुचीकोरवी असे या दुर्देवी मातेचे नाव आहे. या कृत्याबद्दल सुनिल याला जिल्हा… Continue reading कोल्हापूरात मातेचा निर्घुण खून करणाऱ्या क्रूरकर्मा मुलाला फाशीची शिक्षा…

गगनबावडा तालुक्यातील केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना धान्य मिळणार (व्हिडिओ)

साळवण (प्रतिनिधी)  :  गगनबावडा तालुक्यातील केशरी कार्डधारकांना धान्य मिळावे म्हणून गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांना २५ जून रोजी मराठा समाज संघटनेतर्फे निवेदन देऊन ९ जू्लै रोजी साळवण रस्त्यावर चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता. यावेळी तहसिलदारांनी तातडीने कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाला ही बाब कळवली. जिल्हा पुरवठा विभागाने याची गांभीर्याने दखल घेत मराठा समाज संघटनेच्या मागण्या मान्य… Continue reading गगनबावडा तालुक्यातील केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना धान्य मिळणार (व्हिडिओ)

इचलकरंजीत पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे पेट्रोलपंपावर कमी पेट्रोल देवून ग्राहकांची लूट करत असल्याचा गंभीर प्रकार आज (गुरुवार) सतेज फायटरने उघडकीस आणला. शहरातील जयहिंद मंडळासमोरील असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार उघडीस आला. यावेळी हा प्रकार वाहनधारकांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांनी पेट्रोलपंपाला घेराव घातला आहे. या पंपावर एक लिटरच्या मापकातून केवळ ७५० मिली पेट्रोल  वाहनधारकांना दिले जात आहे.… Continue reading इचलकरंजीत पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट…

आजरा येथील ठाकरे विकास संस्थेची शंभर टक्के कर्जवसुली…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेची ३० जूनअखेर सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, संस्थेने सभासदांना ऊसपीक, खावटी तसेच किसान सहाय्य मध्यम मुदत, ट्रॅक्टर ट्रॉली मध्यम मुदत आशा संपूर्ण कर्जांची वसुली सभासद पातळीवर केली आहे.… Continue reading आजरा येथील ठाकरे विकास संस्थेची शंभर टक्के कर्जवसुली…

फये येथे शेतीच्या वादातून एकास बेदम मारहाण : पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे शेतीच्या कारणावरून एकास वडील-मुलाने खुरप्याने व काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवार सकाळी घडला. यामध्ये जखमी झालेल्या विठ्ठल आप्पासाहेब पाटील (वय ५०, मूळ गाव फये, सध्या रा. गारगोटी) यांनी भुदरगड पोलिसांत आज (बुधवार)फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग बाळू पाटील व वैभव पांडुरंग पाटील (रा. फये, ता. भुदरगड) या… Continue reading फये येथे शेतीच्या वादातून एकास बेदम मारहाण : पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा…

केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी तानाजी कोदले बिनविरोध

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी तानाजी लहू कोदले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच वसंत गणपती जाधव यांचा निर्धारित कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. आज (बुधवार) सरपंच के. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोदले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सरपंच के. एल पाटील म्हणाले की, पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रभाग रचनेनुसार… Continue reading केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी तानाजी कोदले बिनविरोध

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १६१२ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १४५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३५१ तर करवीर तालुक्यात २५९ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३५१, आजरा- ५२, भुदरगड- ४०, चंदगड- ४२, गडहिंग्लज- ७३, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १६१२ जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (बुधवार) दिली आहे. ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी, ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावांमधील… Continue reading जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

error: Content is protected !!