कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी राज्याचे संचालक-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा व कोविड -१९ पुणे विभागीय जनजागृती समिती अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सहकार्यातून ऑक्सफॅम इंडिया यांच्याकडून सुमारे ८ लाखांची औषधे आणि साहित्य प्रदान करण्यात आले.

महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्सफॅम इंडिया यांनी Oxygen Flow Meter, Oxygen Nasal mask, Nebulizet Machin, Semi Fowler bed, BP Apparatus, Oxygen Cylinder, PPE Kit, N95 Mask, Sanitizer, Gloves, Handwashing Liquid, Face Shield असे सुमारे ८ लाखांचे साहित्य आणि औषधे दिली. या वेळी ऑक्सफॅम इंडियाचे प्रमुख परमेश्वर पाटील, प्रविण पोवार स्वच्छता दूत अमित देशपांडे, नागेश देसाई, खंडेराव पाटील उपस्थित होते.