कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४२८ तर करवीर तालुक्यात ३३१ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र४२८, आजरा- १०१, भुदरगड- ३७, चंदगड- २०, गडहिंग्लज- ५३, गगनबावडा – ७, हातकणंगले – १६२, कागल- १२५करवीर- ३३१, पन्हाळा- १२९, राधानगरी- ७९, शाहूवाडी – ३७, शिरोळ – ११३, नगरपरिषद क्षेत्र- १३५, इतर जिल्हा व राज्यातील- १९ अशा १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ६८, ३४५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ४९, ९११  

मृतांची संख्या – ४, ९२०

उपचार सुरु असलेले रूग्ण – १३,५१४