‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील भूमिकेचा मला सार्थ अभिमान : अक्षय मुडावदकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील सध्या प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघायला मिळत आहे. तसेच ही भूमिका मला साकारायला मिळाली याचा… Continue reading ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील भूमिकेचा मला सार्थ अभिमान : अक्षय मुडावदकर

भुदरगड तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांवर गुन्हा…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या वनहद्दीत वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या टोळीला आज (गुरुवार) गारगोटी वनविभागाने पकडले आहे. याप्रकरणी खांडवा मध्यप्रदेश इथल्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर तिरता आमास रजपुत (वय ४०) या महिलेला अटक केली असून दोघेजण फरारी झाले आहेत. पारदेवाडीच्या वनहद्दीत रानडुकरांसह अन्य वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर… Continue reading भुदरगड तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांवर गुन्हा…

आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे महत्वाचे पाऊल : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या… Continue reading आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे महत्वाचे पाऊल : मुख्यमंत्री

‘आमचा मुरलीधर गोकुळात गेला’ : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी गोकुळ दूध संघावर शासन नियुक्त संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर मुरलीधर जाधव हा एक सच्चा निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळेच आमचा मुरलीधर गोकुळात गेला असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा सहकार क्षेत्रातील मानबिंदू… Continue reading ‘आमचा मुरलीधर गोकुळात गेला’ : उद्धव ठाकरे

सारथी उपकेंद्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छ. शाहू महाराजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे २६ जून रोजी सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्राचा मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन योजना राबविण्यासंदर्भात आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सारथीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष… Continue reading सारथी उपकेंद्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६११ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३८६ तर करवीर तालुक्यात ३०१ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३५१, आजरा- ४३, भुदरगड- ३८, चंदगड- ३०, गडहिंग्लज- ४८, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६११ जणांना लागण

वसगडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वसगडे येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्याबद्दल अज्ञातावर आज (गुरुवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि. ६) रोजी शाळेमध्ये प्रोजेक्ट बुक जमा करून येते असे सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र, ती घरी परत आली नाही. तिच्या वडिलांसह कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली पण ती… Continue reading वसगडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण…

शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त गावात लसीकरण करावे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये दरवर्षी महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली जातात. तर काही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे कृष्णा, पंचगंगा,  वारणा, दुधगंगा काठच्या गावांमध्ये कोव्हिडचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. नदीकाठच्या जवळपास २८ गावांची पुरामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडते. अशा पुरग्रस्त भागातील गावांमध्ये लसीकरण करावे, असे निवेदन आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात… Continue reading शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त गावात लसीकरण करावे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राजू शेट्टी, महाडिक, भाजपा नेत्यांची शिरोळ येथे विशेष बैठक (व्हिडीओ)…

शिरोळ (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणूकीमध्ये माजी खा. राजू शेट्टी, महाडिक गट तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आले होते. हाच धागा पकडून माजी खा. धनंजय महाडिक जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर माजी खा. राजू शेट्टी यांची शिरोळ येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज (गुरुवार) भेट घेत पाठिंब्याबाबत चर्चा केली.  आज पुन्हा एकदा माजी खा. राजू शेट्टी… Continue reading राजू शेट्टी, महाडिक, भाजपा नेत्यांची शिरोळ येथे विशेष बैठक (व्हिडीओ)…

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म मानाचा,  म महानतेचा, म मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. या गाण्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार आणि रंजक झाले आहे. या गीताच लेखन समीर सामंत यांचे… Continue reading ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

error: Content is protected !!