आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेची ३० जूनअखेर सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले की, संस्थेने सभासदांना ऊसपीक, खावटी तसेच किसान सहाय्य मध्यम मुदत, ट्रॅक्टर ट्रॉली मध्यम मुदत आशा संपूर्ण कर्जांची वसुली सभासद पातळीवर केली आहे. संस्थेने सभासद शेतजमीन खरेदीसाठी १२ लाखांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे अध्यक्ष इब्राहिम दरवाजकर, सचिव सुभाष पाटील, प्रभारी विभागीय अधिकारी, बँक निरीक्षक शिवाजी रायकर, वसुली अधिकारी इब्राहिम इंचनाळकर, शाखाधिकारी नाना नार्वेकर, शिवाजी पाटील, संचालक, सभासद यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.