शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार राजापूर गावात कृषिदूत म्हणून प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. यावेळी राजापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, कृषी विषयक प्रशिक्षणामध्ये चार महिने कृषीदूत म्हणून कार्य करणार आहेत.यामध्ये प्रयोगशील शेती आणि त्यामधील तंत्र समजून घेत प्रशिक्षणार्थी कृषिदूत अभ्यासपूर्ण माहिती घेणार आहेत. राजापूर भागातील शेती शेतकरी आणि प्रयोगशील शेती विषयी कामाची माहिती घेत नवे तंत्रज्ञान अभ्यासणार आहेत. त्यामध्ये शेतीविषयक माहीती, कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती, शेतकऱ्यांना माहितीपर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत.

यावेळी सरपंच गीता दिवटे, उपसरपंच जावेद जमादार, ग्रामसेवक एस. व्ही. धुपदाळे कृषिदुत प्रतिक भूयेकर, ओंकार चव्हाण खोत, दिगंबर इंगळे, स्वप्निल जाधव, इंद्रनील एडके, हर्षद खिलारे उपस्थित होते.