कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात. यासाठी भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शनाला उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत आहे. कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे होंत असलेल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता हरियाणा चॅम्पियन गोलू टू हा १० कोटीचा रेडा आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,विधानसभा सदस्य विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक यांची उपस्थिती असणार आहे.

तसेच भागीरथी महिला संस्था अध्यक्ष अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम,व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज सत्यजित भोसले आदि उपस्थित असणार आहेत.

या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ,मध व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे. त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांसाठी शेतीचे अवजाराहे ठेवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.


तर शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली असून कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. तसेच तीन दिवस शेती विषयक व्याख्यानेही देण्यात येणार आहेत. तर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे, आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.