करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार-पाच दिवसापासून करवीर तालुक्यात जोरदार रब्बीच्या पावसाने जोर धरला आहे. दररोज पावसाच्या हजेरीने खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. ऐन भरणीला येणारी भाताची पीके कोलमडू लागली आहेत. परिणामी भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. जोरदार पावसामुळे करवीर तालुक्यात सर्वत्र भुईमग, सोयाबीन पिकांच्या काढणीची कामे थंडावली आहेत. जोरदार पावसामुळे आडसाली ऊस लागणीच्या… Continue reading करवीर तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय…

कृषिदूत शितल तवलेचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

परभणी (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय सेलूचे विद्यार्थिनी शितल तवलेंनी चकलंबा गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. शितल यांनी कृषि कार्यानुभव RAWE 2020-21 प्रकल्पांतर्गत  पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी ? त्याचे फायदे, तोटे आणि अनेक जीवामृत प्रक्रिया, चारा प्रक्रिया, शेतकऱ्यांना पीक कर्जाबद्दल माहिती, बँक पीक कर्ज विषयी माहिती, जनावरांना लसीकरण, ठिबक… Continue reading कृषिदूत शितल तवलेचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

साळवण (संभाजी सुतार) : कोरोनाचा संसर्ग शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा विचार करून तालुक्यातील निवडे येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक ए. डी. माने यांना भेटून शेतकऱ्यांसाठी बँकेमार्फत कोविड सेंटर उभे करावे, किंवा बँकेमार्फत प्रत्येक तालुक्याला व्हेंटिलेटर बेड द्यावेत, असे संस्थेचे व्हाईस चेअरमन… Continue reading गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीचे लेबर बजेट आणि कृती आराखडा सन २०२१-२२ तसेच सुधारित कृती आराखडा सन २०२०-२१ तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपापल्या गावच्या शिवार फेरीमध्ये सहभागी होत, माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या आणि सामूहिक स्वरुपाच्या कामांचा समावेश कृती आराखड्यात करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते म्हणाले,… Continue reading विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

शियेमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचे स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिये (ता. करवीर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने कृषीक्षेत्राशी संबंधित मंजूर केलेल्या विधेयकाचे साखर वाटप करून स्वागत करण्यात आले. अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, शेतकऱ्यांना देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत शेतमाल विकण्याची मुभा देणे, आंतरराज्य शेतमाल विक्रीला परवानगी, व्यापारी आणि प्रक्रियादारांनासह रिटेल दुकानदारांना थेट शेतात जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देणे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला… Continue reading शियेमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचे स्वागत

शेतकऱ्याने पेटवला ३० एकरातील भुईमुग

जुनागड (वृत्तसंस्था) : जुनागडातील माडिया हाटिनाच्या पानिघ्रा इथं राहणाऱ्या एका शेतकऱ्याने ३० एकर जमिनीत भुईमुग लावला होता.  पण, मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी हाताने लावलेल्या पिकाला पेटवून दिले. शेतकरी गिरिराज सिंह यांना प्रचंड नुकसानीचा फटका बसला आहे. गिरिराज सिंह यांनी मोठ्या मेहनतीने भुईमुगाचे पिक घेतले होते. पण पावसामुळे ते वाहून… Continue reading शेतकऱ्याने पेटवला ३० एकरातील भुईमुग

प्लास्टिक फुलांच्या बंदीवर लवकरच घोषणा होण्याची शक्यता – कृषीमंत्री

वर्धा : कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषी मंत्री दादाजी भुसे दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधत आहेत. आज ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यातील जिल्हा परिषदेतून त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला तेंव्हा लॉकडाऊनचा फुलशेतीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे… Continue reading प्लास्टिक फुलांच्या बंदीवर लवकरच घोषणा होण्याची शक्यता – कृषीमंत्री

error: Content is protected !!