‘बारावी’ निकालाचा पॅटर्न ठरला..!

मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज (शुक्रवार) शिक्षण मंडळाने २०२०-२१ साठी बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. इयत्ता दहावीमधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण… Continue reading ‘बारावी’ निकालाचा पॅटर्न ठरला..!

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध करून  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असं आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती… Continue reading गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ल्यात कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अशोक चक्र पदकाने सन्मान करण्यात आला होता. आता त्यांना आणखी नव्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात संशोधकांना सापडलेल्या नव्या कोळी प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव दिले गेले आहे. संशोधक ध्रुव प्रजापती… Continue reading हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, कोरोनाचा नवीन ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिअंट हा अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. एम्सच्या संचालकांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण मिळाल्याने राज्य सरकारने आजपासून संपूर्ण राज्यात निर्बंध कडक केले आहे. या पार्श्वभूमीवर… Continue reading घाबरू नका ! ‘डेल्टा प्लस’ धोकादायक नाही : ‘सीएसआयआर’चा अहवाल

नवी नियमावली : संपूर्ण राज्याचा समावेश आता तिसऱ्या गटात…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याने लावण्यात आलेले कडक निर्बंध ५ टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक असून त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं आढळून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं… Continue reading नवी नियमावली : संपूर्ण राज्याचा समावेश आता तिसऱ्या गटात…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची एनसीबीकडून चौकशी…

मुंबई (प्रतिनिधी) :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकर याला ड्रग्सच्या एका प्रकरणात मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो  कार्यालयात आणले गेले आहे. त्याची एनसीबीने चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे डॉन दाऊद इब्राहिमच्या मोठा धक्का मानला जात आहे. इक्बाल कासकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकरला… Continue reading अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची एनसीबीकडून चौकशी…

माजी गृहमंत्री अऩिल देशमुखांच्या घरावर ‘ईडी’ची छापेमारी…

मुंबई (प्रतिनिधी) :  परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातचं आता अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे.  माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सध्या तिथे तपास सुरू असून अनिल देशमुखांच्या… Continue reading माजी गृहमंत्री अऩिल देशमुखांच्या घरावर ‘ईडी’ची छापेमारी…

जिल्हे अनलॉक करण्याची घाई नको ! : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाहीये. तज्ज्ञांनी आपल्याला तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घाई-गडबडीने घेऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज (गुरुवार) सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत… Continue reading जिल्हे अनलॉक करण्याची घाई नको ! : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आशा सेविकांचा संप मिटला…

मुंबई (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका संपावर गेल्या होत्या. आशा सेविकांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनही केले होते. मागील दोन दिवसांपासून आशा सेविका संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे. एक जुलैपासून आशा सेविकांना निश्चित मानधनात एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री… Continue reading आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आशा सेविकांचा संप मिटला…

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्लीत होणार मराठी मुलांसाठी वसतिगृह…

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चांगुलपणाच्या चळवळी’चे संकल्पक- संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. ‘चांगुलपणाच्या चळवळी’च्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाची शंभर भाग पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा… Continue reading डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्लीत होणार मराठी मुलांसाठी वसतिगृह…

error: Content is protected !!