मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज (शुक्रवार) शिक्षण मंडळाने २०२०-२१ साठी बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. इयत्ता दहावीमधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा ३० टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये १२ वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता १० वी आणि इयत्ता ११ वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत १२वी च्या मूल्यमापन प्रकियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही. त्यामुळे १२ वी परीक्षा २०२१ साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी, तोंडी / प्रत्यक्षिक / अंतर्गत मूल्यपापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत.

निकाल असा लावला जाणार –

दहावी मार्क्स यावर ३० टक्के

११ वीचे मार्क्स यावर सरासरी ३० टक्के

१२  वीसाठी अंतर्गत परीक्षा यावर ४० टक्के गुण असतील.