भाजपचे ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत  : शरद पवार

ठाणे : राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाहीत. पुढच्या निवडणुकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले. आता २०२३ साठी आता ५ ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष… Continue reading भाजपचे ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत  : शरद पवार

कार्यकर्त्यांकडूनच करुणा मुंडे यांना ३० लाखांचा गंडा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे ३० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले; मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरमधील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारत संभाजी भोसले (कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष… Continue reading कार्यकर्त्यांकडूनच करुणा मुंडे यांना ३० लाखांचा गंडा

राष्ट्रवादी ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणेचे टी शर्ट वाटणार

जळगाव : पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील आमदारांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. या घोषणांनी घायाळ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून पलटवार करण्याचा प्रयत्न आला. आता याच घोषणेवरून राष्ट्रवादी राज्यभरात रान उठवण्याची शक्यता निर्माण झाली असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांनी याबाबत मागणी केली आहे.… Continue reading राष्ट्रवादी ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणेचे टी शर्ट वाटणार

शिर्डीत साई मंदिराच्या गेटवर तुफान राडा

शिर्डी : येथील साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि फुल विक्रेत्यांमध्ये आज झटापट झाली. साई मंदिरात हार, फुले आणि प्रसादावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात मंदिर परिसरातील हार, फुल आणि प्रसाद विक्रेते आक्रमक झाले. त्यांनी आज आंदोलन केले. साई मंदिरात हार, फुले प्रसादावरील बंदी उठवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. गेल्या १० महिन्यांपासून ही बंदी घालण्यात आली… Continue reading शिर्डीत साई मंदिराच्या गेटवर तुफान राडा

‘जांब येथील मंदिरातून ऐतिहासिक मूर्तींची चोरी

जालना : जालना जिल्ह्यातील ‘समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून पहाटेच्या सुमारास  ७०० वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या संदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तपास केला जाईल. तसेच चोरट्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती… Continue reading ‘जांब येथील मंदिरातून ऐतिहासिक मूर्तींची चोरी

सीआयडी चौकशी; ज्योती मेटेंनी सरकारचे मानले आभार

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थितीत केलेल्या होत्या. हा घात आहे की अपघात? असा प्रश्न खुद्द मेटे कुटुंबीयांनीच उपस्थितीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबद्दल ज्योती मेटे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. शिवाय… Continue reading सीआयडी चौकशी; ज्योती मेटेंनी सरकारचे मानले आभार

कोयना धरण ८०.९७ टक्के भरले

कराड (प्रतिनिधी) : कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार १४७ फुटांवर गेली असून, एकूण पाणीसाठा ८५.३१ टीएमसी झाला आहे. धरण आतापर्यंत ८०.९७ टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. गुरुवारी दुपारी… Continue reading कोयना धरण ८०.९७ टक्के भरले

‘पंकजा मुंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी : महाजन

जळगाव  : भाजपच्या नेत्या ‘पंकजा मुंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार आहेत, अशी माहिती भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती, त्यावर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. गिरीश महाजन… Continue reading ‘पंकजा मुंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी : महाजन

जालन्यामध्ये प्राप्तिकर विभागाने जप्त केले ३९० कोटींचे घबाड

जालना :  जालन्यामध्ये प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या स्टील कारखानदरांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. यामध्ये तब्बल ३९० कोटींचे घबाड जप्त केले आहे. स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरावर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स आणि कालिका स्टील अलॉयज कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यात आयकर… Continue reading जालन्यामध्ये प्राप्तिकर विभागाने जप्त केले ३९० कोटींचे घबाड

भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतोय :  शरद पवार

बारामती : भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवत आहे. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. वेळीच सावध होत नितीश कुमार यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याचे शरद पवारांनी नमूद केले. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याने राजकीय भूकंप आले आहे. त्यानंतर बोलताना शरद… Continue reading भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतोय :  शरद पवार

error: Content is protected !!