मुंबई (प्रतिनिधी) :  परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातचं आता अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. 

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सध्या तिथे तपास सुरू असून अनिल देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या अनुषंगाने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या. आज (शुक्रवार) अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती. परंतु, अनिल देशमुखांना आज अटक होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.