मुंबई (प्रतिनिधी) :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकर याला ड्रग्सच्या एका प्रकरणात मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो  कार्यालयात आणले गेले आहे. त्याची एनसीबीने चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे डॉन दाऊद इब्राहिमच्या मोठा धक्का मानला जात आहे.

इक्बाल कासकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीने ताब्यात घेतले होते. दरम्यान, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आज (शुक्रवार) त्याला एनसीबीच्या कार्यालयात आणून चौकशी सुरु केली. आता या चौकशीत काय माहिती पुढे येते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.