काय सुरु, काय बंद ? : जाणून घ्या, नवी नियमावली   

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य  सरकारने आज (गुरूवार) रात्री ८ वाजल्यापासून नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये २२ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. सर्वसामान्यांना लोकल प्रवासबंदी केली असून अत्यावश्यक सेवेतील व सरकारी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येणार आहे. याशिवाय खासगी गाड्यांमधून दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यांमध्ये प्रवास करता येणार नाही. बँका,… Continue reading काय सुरु, काय बंद ? : जाणून घ्या, नवी नियमावली   

नाशिक दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांची गय नाही : मुख्यमंत्री  

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे,  मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू?  अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे,  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना… Continue reading नाशिक दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांची गय नाही : मुख्यमंत्री  

गुंडाला मिरवणुकीसाठी मदत केल्याबद्दल माजी खासदार संजय काकडेंंना अटक…

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी मदत केल्याबद्दल त्यांना गुन्हे शाखेने आज (बुधवार) अटक केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा… Continue reading गुंडाला मिरवणुकीसाठी मदत केल्याबद्दल माजी खासदार संजय काकडेंंना अटक…

कोविशिल्ड लसीचे दर ‘सीरम’कडून जाहीर

पुणे  (प्रतिनिधी) :  देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण करण्यास केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने  कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढविले आहे. तसेच  लसीचे दरही जाहीर केले आहेत. याबाबत  सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या स्वाक्षरीने एक पत्रक प्रसिद्ध  करण्यात आले आहे. सीरमने पुढील दोन महिन्यांत  लस… Continue reading कोविशिल्ड लसीचे दर ‘सीरम’कडून जाहीर

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू ! जाणून घ्या सुधारित नियमावली…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू केले. पण नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून नवी नियमावली जाहीर करत निर्बंध अधिक कडक केले आहेत. या नव्या नियमांनुसार किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ आणि चिकन-मटणाची दुकानं सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहणार आहेत. खाद्यपदार्थांची… Continue reading राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू ! जाणून घ्या सुधारित नियमावली…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज (मंगळवार) दुपारी निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने आजारी होते. त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. किशोर नांदलस्कर यांनी अनेक नाटके,… Continue reading ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन…

किराणा दुकाने दिवसातून केवळ चारच तास राहणार खुली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. संचारबंदी असूनही किराणा मालाच्या खरेदीसह विविध निमित्ताने नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. त्यामुळे किराणा मालाची दुकाने केवळ चार तास म्हणजे सकाळी ७ ते ११ याच वेळेत खुली राहतील, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना याच वेळेत किराणा मालाची खरेदी करता… Continue reading किराणा दुकाने दिवसातून केवळ चारच तास राहणार खुली…

जाणून घ्या, कोरोनाची नवीन लक्षणे…

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने वाढली आहे. मृत्यूदरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे डॉक्टरही गोंधळून गेले आहेत. आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण आला आहे. देशात मागील चोवीस तासांत सुमारे पावणे तीन लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तर १६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवीन लक्षणे… Continue reading जाणून घ्या, कोरोनाची नवीन लक्षणे…

राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन… : विजय वडेट्टीवारांचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी पुकारण्यात असली तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही. दररोज कोरोना रुग्णसंख्येत आणि मृत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू शकतो, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे… Continue reading राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन… : विजय वडेट्टीवारांचा इशारा

राज्यात आणखी कडक निर्बंध..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. असं असताना सरकारने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी केली. मात्र संचारबंदी लावूनही लोक नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत. त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टींच्या विक्रीवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (गुरुवार) एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही… Continue reading राज्यात आणखी कडक निर्बंध..?

error: Content is protected !!