‘Animal’ चा Box Office वर धूमाकूळ; रणबीरने 3 दिवसात तोडले ‘हे’ रेकॉर्ड

मुंबई ( वृत्तसंस्था ) रणबीर कपूरचा ‘अनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात भारतात 200 कोटींची कमाई केली आहे. आता यावर्षी बंपर कमाई करणारा पठाण जवान आणि गदर 2 ला मागे टाकण्याच्या शर्यतीत तो आहे. अॅनिमल मूव्हीने देशाच्या विविध भागात कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटाने गुजरात… Continue reading ‘Animal’ चा Box Office वर धूमाकूळ; रणबीरने 3 दिवसात तोडले ‘हे’ रेकॉर्ड

संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, मी विरोधकांनाही सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी संसदेतील निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये. पराभवाचा राग काढण्याऐवजी सकारात्मक चर्चा व्हायला हवी, असे ही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या 9 वर्षांपासून पसरवलेले नकारात्मक विचार बदलले… Continue reading संसदेत परतल्यावर पराभवाचा राग काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढला चिमटा

भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

मोठी बातमी ! 20 लाखांची लाच घेताना ‘ईडी’ अधिकारी रंगेहात जाळ्यात

चेन्नई ( वृत्तसंस्था ) तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. केंद्र सरकार ईडीचा वापर करत विरोधकांवर अनावश्यकरित्या कारवाई करत असल्याचा आरोही विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या अंकित तिवारी नावाच्या एका कथित ईडी अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी… Continue reading मोठी बातमी ! 20 लाखांची लाच घेताना ‘ईडी’ अधिकारी रंगेहात जाळ्यात

मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मणिपूरमधील शवागारात ठेवलेल्या मृतदेहांचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. जे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत आणि ज्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे आणि हे लक्षात घेऊन मृतदेह शवागारात राहू देणे योग्य होणार नाही. मृतदेहांच्या… Continue reading मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

नक्षलवाद्यांनी पकडले; त्यांच्या कोर्टात शिक्षा अन् गडचिरोलीत 15 दिवसांत तिसरी हत्या

नागपुर ( प्रतिनिधी ) नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये तिसऱ्या आदिवासी नागरिकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 24 तासांच्या कालावधीत माओवाद्यांनी तिसरी घटना घडवली आहे. तिसरी घटना 24 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका आदिवासी शेतकऱ्याला ओढून नेल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कपेवंचा गावात राहणारे रामजी चिन्ना आत्राम (28) यांचा मृतदेह 25 नोव्हेंबर रोजी आढळून… Continue reading नक्षलवाद्यांनी पकडले; त्यांच्या कोर्टात शिक्षा अन् गडचिरोलीत 15 दिवसांत तिसरी हत्या

9 वर्षांच्या एमिलीची हमासच्या बंदिवासातून सुटका; मेली म्हणत वडिलांनी शोधला 23 दिवस मृतदेह

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या बंदिवासातून 25 नोव्हेंबर रोजी रात्री 13 ओलिस इस्रायलमध्ये पोहोचताच 9 वर्षांची असणाऱ्या एमिली हँड धावत आली आणि तिच्या वडिलांना मिठी मारली. दोघेही वडील आणि मुलगी बराच वेळ रडत राहिले. कुटुंबीयांनी दोघांची काळजी घेतली आणि त्यानंतर एमिलीला आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, 7 ऑक्टोबरला हमासच्या… Continue reading 9 वर्षांच्या एमिलीची हमासच्या बंदिवासातून सुटका; मेली म्हणत वडिलांनी शोधला 23 दिवस मृतदेह

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर नासाचे प्रमुख भारत दौऱ्यावर..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) नासाचे प्रमुख बिल नेल्सन सोमवार, 27 नोव्हेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर येणारे नेल्सन येथे अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. संशोधन, विशेषत: मानवी शोध आणि पृथ्वी विज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी नेल्सन दोन्ही देशांतील अंतराळ अधिकाऱ्यांची भेट घेतील. नासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे… Continue reading चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर नासाचे प्रमुख भारत दौऱ्यावर..!

वर्ष आरंभापूर्वीच केंद्राची कर्मचाऱ्यांना मोठी भेट; DA***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) नवे वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. याआधीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 6 व्या आणि 5 व्या वेतन आयोगाच्या पूर्व सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही खूशखबर दिली आहे. आता सरकारने सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSE) मध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात… Continue reading वर्ष आरंभापूर्वीच केंद्राची कर्मचाऱ्यांना मोठी भेट; DA***

मोदी म्हणजे अपयशात मायेने धीर देणारे कुटुंबप्रमुख- चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) यंदाचा 2023 चा विश्वचषक सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. ऑस्ट्रेलिया या विश्वचषकाचा मानकरी ठरला. परंतु भारतीय संघाने मात्र अद्भुत क्रीडा कौशल्य प्रदर्शित करत 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. अंतिम सामना जरी जिंकता आला नसला तरी देशातील प्रत्येक नागरिकाचे मन जिंकण्यात भारतीय क्रिकेट संघ यशस्वी… Continue reading मोदी म्हणजे अपयशात मायेने धीर देणारे कुटुंबप्रमुख- चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!