डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

पुणे (प्रतिनिधी) : सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता. परंतु, नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन् अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे. असे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी डिजिटल मीडिया… Continue reading डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

कुडाळ नगरसेवकांचा काश्मीर दौरा वादात…

कुडाळ (प्रतिनिधी) : प्रशिक्षण निश्चित नसताना कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक काश्मीर येथे जाऊन आले. या झालेल्या खर्चाला जबाबदार कोण ? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांनी फक्त मजा केली असल्याचा आरोप केला जात आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांसाठी काश्मीर येथे सभा शास्त्र तसेच नगरपंचायतीच्या कायद्यांसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कुडाळ नगर… Continue reading कुडाळ नगरसेवकांचा काश्मीर दौरा वादात…

गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू : डॉ. गणपती कमळकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. जिल्ह्यातील वाढत्या पटाच्या शाळा तसेच कमी पटाच्या शाळांचा अभ्यास करुन गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू. अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली. ते आज (बुधवार) प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारताना बोलत होते. कळमळकर म्हणाले की, आपण प्राथमिक शिक्षक होतो. एमपीएससी… Continue reading गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू : डॉ. गणपती कमळकर

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर…

मुंबई (प्रतिनिधी) : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एखाद्याचा वाढदिवस, परीक्षेचा निकाल किंवा एखादी आनंदाची बातमी असेल तर आपण व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करतो आणि या खास गोष्टी इतरांपर्यंत पोहचतात. मात्र, तो व्हिडिओ 30 सेंकदात व्हायचा. पण, आता कंपनीने स्टेटस या फीचरसाठी अपडेट जारी केला आहे. कंपनीने इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एका नवीन फीचरची सध्या चाचणी… Continue reading व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर…

सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे : किशोर तावडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवावे. एखाद्या खात्यातून संशयास्‍पद व्‍यवहार होत असल्यास त्‍याची माहिती जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीला दयावी. कोणताही निर्णय बॅंकांनी त्यांच्या स्‍तरावर घेवू नये असे निर्देश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्‍यक्षतेखाली लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हयातील सर्व बॅंक… Continue reading सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे : किशोर तावडे

मोठी बातमी : फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखांची रोकड जप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखांची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी ११.३० सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये १० लाखांची रक्कम आढळून आली. उपविभागीय पोलीस… Continue reading मोठी बातमी : फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखांची रोकड जप्त

सरंबळ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षकांची घेतली भेट…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. तसेच जिल्ह्यात होत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरच्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले. हे व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते.परंतु या… Continue reading सरंबळ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षकांची घेतली भेट…

सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

प्रतिनिधी ( सिंधुदुर्ग ) शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी संचमान्यता आदेश काढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या आदेशाबाबत फेरविचार न झाल्यास सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास… Continue reading सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा… Continue reading सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त नाधवडे महादेव मंदिर परिसरात 18 ते 20 मार्च दिवशी जाणता राजा या महानाट्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे समस्त सिंधुदुर्गकरांना हे नाटक अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 मार्च या… Continue reading सिंधुदुर्गकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य…

error: Content is protected !!