कट्टा येथील धोकादायक वळणावर रिक्षा-स्कार्पिओमध्ये अपघात ; एकाचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-नांदगाव मार्गावर कट्टा नजीक धोकादायक वळणावर स्कार्पिओ आणि रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील प्रवासी राजेश विष्णू शेडगे (वय ५०, रा. कट्टा भंडारवाडी) हे जागीच ठार झाले. या अपघातात रिक्षाचालक अक्षय विवेकानंद किर (वय २७, रा. कट्टा) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल (रविवार) सायंकाळीच्या सुमारास घडला. पोलिसांकडून… Continue reading कट्टा येथील धोकादायक वळणावर रिक्षा-स्कार्पिओमध्ये अपघात ; एकाचा मृत्यू

तळवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू…

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळवडे झाजमतर खाडीत जयदीप पांडुरंग घाडी या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (गुरुवार) घडली. जयदीप पांडुरंग घाडी (वय २३, रा. तळवडे घाडीवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळवडे घाडीवाडी येथील जयदीप घाडी हा आपल्या चार मित्रांसोबत काल सायंकाळच्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतून… Continue reading तळवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू…

बुलेरो टेम्पोला खासगी आराम बसची धडक : सुदैवाने जिवीतहानी नाही

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी कोणीचे वळणं येथे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास खाजगी आराम बस आणि महिंद्रा बोलेरो टेम्पोमध्ये अपघात झाला. या अपघातात खाजगी आराम बसचे दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी नजीक असलेल्या कोणीचे वळण… Continue reading बुलेरो टेम्पोला खासगी आराम बसची धडक : सुदैवाने जिवीतहानी नाही

ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशनने घेतली देवगड आगार व्यवस्थापकांची भेट

देवगड (प्रतिनिधी) : इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांची भेट घेऊन देवगड बस स्थानकाच्या पुनर्बांधणी दुरुस्तीच्या कामाबाबत चर्चा केली. यावेळी देवगड बसस्थानकाची इमारत जुनी जीर्ण झाली असून या इमारतीच्या पुनर्बांधणी दुरुस्तीकरिता सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि सद्यस्थितीत हे… Continue reading ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशनने घेतली देवगड आगार व्यवस्थापकांची भेट

गाबीत समाज-फागगीते ग्रंथला समीक्षा ग्रंथ पुरस्काराचे वितरण

देवगड (प्रतिनिधी) : गाबीत समाज आणि फागगीते या प्रा. डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी लिहिलेल्या ग्रंथास “प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र” यांचा समीक्षा ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे यांच्या हस्ते शाल,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि काही वाचनीय ग्रंथ डॉ. सारंग यांना… Continue reading गाबीत समाज-फागगीते ग्रंथला समीक्षा ग्रंथ पुरस्काराचे वितरण

साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

देवगड (प्रतिनिधी) : साळशी येथिल श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी सेवा संस्था साळशी-परबवाडी यांच्या विद्यमाने श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी कुलदेवता मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा ९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ९ मे रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा, ६ वाजता स्थानिक भजने, ७… Continue reading साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

हडपीड स्वामी समर्थ मठात उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी ७ वा. पादूका पूजन, १०.३० वा. नामस्मरण, दुपारी १२ वा. महाआरती, १… Continue reading हडपीड स्वामी समर्थ मठात उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

देवगड इथल्या तांडेल खून प्रकरणी ‘त्या’ खलाशाला जामीन मंजूर…

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील ‘मुक्ताई’ या मासेमारी बोटीवर दि. ११/१२/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास लोखंडी भाल्याने हल्ला चढवून तांडेल रणजीत डोर्लेकर याचा खून झाला होता. तसेच सहखलाशांवर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जखमी केल्याप्रकरणी तसेच मासेमारी बोट जाळून टाकल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी अनंत रामचंद्र तांबे याची मे. सत्र न्यायालयाने जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी… Continue reading देवगड इथल्या तांडेल खून प्रकरणी ‘त्या’ खलाशाला जामीन मंजूर…

अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे…

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनच्या नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने तेथील पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन काम सुरू करण्याबाबतचे लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगित करणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी प्रशासनाने संबंधित कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून… Continue reading अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे…

उपवडेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

कणकवली (प्रतिनिधी) : उपवडे धावलवाडी, फोपळवाडी येथील असंख्य भाजप आणि राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. तर पुढील काळात शिवसेना पक्षात योग्य मान सन्मान केला जाईल असे अश्वासित केले. आमदार वैभव नाईक यांनी विविध… Continue reading उपवडेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

error: Content is protected !!